आ.किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश पाचोरा-भडगावात सोमवार पासून भरडधान्य खरेदीला सुरुवात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०१/२०२२
पाचोरा व भडगाव तालुक्यात पणन खरीप हंगाम २०२१/२२ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य खरेदीला सोमवार पासून सुरुवात होत आहे. विशेष बाब म्हणजे पाचोरा व भडगाव येथील भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करावीत याबाबत आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्याचे हे फलित असून ही धान्य खरेदी सुरु होणार असल्याने शेतकरी आनंदी झाला आहे.
भरड धान्य खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याबाबत आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांनी १७ जानेवारी रोजी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेसह जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून विनंती केली होती. या पत्राची तात्काळ दखल घेत भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला त्वरित निर्देश दिले आहेत.
जळगाव जिल्ह्यात सन २०२१ मध्ये उद्भवलेल्या वादळवाऱ्यासह अतिवृष्टी झाल्यामुळे या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पाचोरा, भडगाव, जामनेर, चाळीसगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान देण्यात आले आहे, परंतु या नुकसानी मधून वाचलेला उर्वरित सुमारे ३० ते ३५ टक्के शेतमाल शेतकऱ्यांकडे पडून आहे. सदरील शेतमाल शासनाने खरेदी केल्यास शेतकरी बांधवांना आर्थिक मदत होईल या भावनेतून आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
चौकट – भरडधान्य खरेदीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदार व उपविभागीय अधिकारी व संबंधितांना निर्देश दिले असून
भरड धान्यखरेदीचा शुभारंभ दिनांक २४ जानेवारी सोमवार रोजी आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांचे हस्ते सकाळी १० वाजता पाचोरा येथील शासकीय गोदाम येथे व ११ वाजता भडगाव येथील शासकीय गोदाम येथे काटा पूजन करून करण्यात येणार आहे.