मुलगी पहायला गेले, अन लग्न लावून आले.मुस्लीम समाजाचा आदर्श निकाह.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/१२/२०२१
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील रहीम भाई यांचा मुलगा गुलाब मोहम्मद याचे लग्न करायचे असल्याने मुलाकडील मंडळी नातेवाईकांना सोबत घेऊन शेंदूर्णी येथील जावा शेठ यांची भाची चाळीसगाव येथे आपल्या परिवारासोबत रहाते म्हणून तीला पाहण्यासाठी दिनांक ३ डिसेंबर शुक्रवार २०२१ रोजी चाळीसगाव येथे गेले होते.
चाळीसगाव येथे मुलीच्या घरी पोहचल्यावर मुलगा व मुलगी या उभयतांचा पहाण्याचा कार्यक्रम पार पडला. मुलाला मुलगी व मुलीला मुलगा पसंत पडल्याचे सांगत दोघांनीही लग्नासाठी संमती दर्शवली. याबाबत दोघेही परिवारातील सदस्यांनी सविस्तर चर्चा करुन दोघ परिवाराच्या संमतीने रिश्ता मंजूर झाला. परंतु सद्यस्थितीत कोरोना सारखे संकट डोक्यावर घोंघावत असतांनाच एस.टी.चा संप त्यातल्या त्यात लग्नाच्या बडेजाव पणाने होणारा अनावश्यक खर्च सोबतच होणारी धावपळ टाळण्यासाठी दोघेही परिवारातून तसेच या प्रसंगी हजर असलेले नातेवाईक व समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांनी साध्या पध्दतीने निकाह लावण्याचे ठरविले.
लगेचच दोघेही परिवारातील सदस्यांनी पुढाकार घेत मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजा नुसार वर गुलाब मोहम्मद व वधु जाबेरीया यांचा निकाह (लग्न) साध्या पध्दतीने लाऊन समाजासमोर एक नवा आदर्श घडवून आणला. या विवाह प्रसंगी उपस्थितांनी वधु, वरांना आर्शिवाद दिले. हा विवाह मुस्लिम समाजातील एक आदर्श विवाह ठरला असून या दोघेही परिवाराचे व हा विवाह घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असलेले नातेवाईक व प्रतिष्ठित मान्यवरांचे मुस्लिम समाजातून तसेच सर्व समाजबांधवातून अभिनंदन केले जात असून अश्याच पध्दतीने विवाह समारंभ होणे गरजेचे असल्याचे मत समाज बांधवांनी व्यक्त केले आहे.