रेल्वे प्रशासन , अंबुलन्स चालक व डॉक्टरांनी वाचवले रेल्वे प्रवाशाचे प्राण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०२/२०२१
आज सकाळी ११ वाजता मुंबई हुन अलाहाबाद कडे २२१२९ तुलसी एक्सप्रेस गाड़ी ने जाणाऱ्या एका व्यक्तीला प्रवासात चाळीसगाव ते पाचोरा दरम्यान थोडे अस्वस्थ वाटू लागले ही बाब पाचोरा रेलवे स्टेशन वर कार्यरत असलेले स्टेशन मास्टर जाधव साहेब व पंकज कुमार ( डी.पी.एस.एस.). कापडे साहेब (सी.आय.) व रेल्वे स्टेशनचे कर्मचारी यांना महित झाली. यांनी संबधीत व्यक्तीला त्वरित उपचार मिळावे म्हणून ॲम्बुलन्स बोलवली याची दखल घेत ॲम्बुलन्स चालक किशोर लोहार व बबलु मराठे. यांनी तात्काळ पाचोरा रेल्वेस्टेशन गाठून पिडीत व्यक्तीला सिध्दीविनायक हॉस्पिटलमध्ये मध्ये दाखल केले. डॉक्टर स्वप्नील पाटील यांनी त्वरित उपचार सुरु केले आता त्या व्यक्तीची प्रकृती चांगली असून रेल्वे प्रशासनाचे अधिकारी व ॲम्बुलन्स
चालक तसेच त्वरित उपचारासाठी दाखल करून घेत उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे जनमानसातून सर्वत्र कौतुक होत असून पाचोरा ट्रेन लाईव्ह प्रवासी संघटना चे अध्यक्ष दिलीप पाटील व उपाध्यक्ष अनिल कुमार चंदवानी यांनी आभार मानले आहेत.