शेंदुर्णी येथे मशहूर सुफी संत ख्वाजा गरीब नवाज यांची छटी शरीफ मोठ्या उत्साहात साजरी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०१/२०२३
शेंदुर्णी गावात इस्लाम धर्माचे मशहूर सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती उर्फ ख्वाजा गरीब नवाज यांची ८११ वी छटी शरीफ (पुण्यतिथी) मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. सुफी संत ख्वाजा गरीब नवाज यांची दरगाह अजमेर शरीफ राजस्थान येथे आहे. त्यांनी भारत मध्ये एकता, समानता व बंधुत्व याचा संदेश दिला होता. या दिवशी लाखोंची संख्याने अनेक धर्म, जात चे लोक विविध स्थान वर त्यांची छटी शरीफ साजरा करतात. शेंदुर्णी गावात मोमीन मोहल्ला मध्ये नवजवानाने अहले सुन्नत यांच्या मार्फत छटी शरीफच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते.

या कार्यक्रम मध्ये मुख्य अतिथी म्हणून खतीब- इमाम रजा मस्जिद शेंदुर्णी चे मौलाना अब्दुल कादिर हे उपस्थित होते. त्यांनी गरीब नवाज यांचे जीवनावर प्रकाश टाकले. मंचवर मौलाना जाबिर रजा, मौलाना इरफान रजा, सलीम भाई पस्थित होते. मौलाना बिलाल रजवी यांनी नात शरीफ पठण केले.

या कार्यक्रमत मध्ये मोठी संख्या मध्ये गावातील सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचा आयोजन शाकीर पिंजारी, फिरोज खान, वसीम बागवान, रऊफ शेख, तनवीर पटवे , फारुक शेख, शोएब पटवे ,मोमीन महोललाचे सर्व युवा यांनी केला.