पाचोऱ्यात महामानवांच्या जयंती निमित्त शिवसेनेकडून खुल्या सामान्य ज्ञान स्पर्धेचे भव्य आयोजन;सहभागाचे आवाहन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०४/२०२२
आगामी काळात होऊ घातलेल्या महात्मा ज्योतीराव फुले, श्री. भगवान महावीर व डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना व युवासेनेच्या वतीने दिनांक १० फेब्रुवारी रविवार रोजी पाचोरा येथील श्री. गो. से. हायस्कूल येथे सकाळी ९.३० वाजता खुल्या सामान्य ज्ञान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यात सहभागी स्पर्धकांना भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या निमित्ताने परिक्षार्थींची आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तयारी देखील करता येणार असल्याने अधिकाअधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्याचे आवाहन पाचोरा शिवसेना व युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
आगामी काळात विविध शासनाच्या भरती प्रक्रियेत तृतीय व चतुर्थ श्रेणीतील पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरतीची घोषणा शासनस्तरावर झाली असून त्यादृष्टीने अनेक परीक्षार्थी तयारीला लागले आहेत. दरम्यान अशा विद्यार्थ्यांचा सदरच्या परीक्षासाठीची भीती कमी होऊन त्यांना सराव करता यावा सोबतच बक्षिसांची लयलूट करता यावी या उद्देशाने सदरच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परीक्षेत सभागासाठी कोणत्याही प्रकारचे सहभाग शुल्क आकारले जाणार नसून १०० मार्कंची बहुपर्यायी प्रकारची प्रश्नपत्रिका असणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकास ५००१/०० रुपये, द्वितीय बक्षीस ३१००/०० रुपये, तृतीय बक्षीस २१००/०० रुपये तर दोन उत्तेजनार्थ प्रत्यकी १०००/०० रुपये रोख स्वरूपात दिले जाणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
तसेच बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या स्पर्धकांना प्रा.राजेंद्र चिंचोले लिखित ‘स्पर्धा परीक्षा सारथी’ हे पुस्तक दिले जाणार आहे. इच्छुकांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, येथे आपले नाव पत्ता व फोन नंबर लिहून चिट्ठी खोक्यात टाकून आपला प्रवेश निश्चित करावा किंवा मोबाइल क्रमांक ९८८१७३४६५६, ९९२१२११६७७, ८६२५८००२१, ८४४१४६४०७२, ८८०५५३१११ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शिवसेना युवासेनेचे वतीने करण्यात आले आहे.