गुमनाम है कोई, बदनाम है कोई. दिव्यांग प्रमाणपत्रांसाठी डॉक्टरांच्या नावाखाली दुसऱ्यांचीच लाचखोरी.
सुमित पाटील.(वावडदा)
दिनांक~३०/११/२२०२१
दिव्यांग प्रमाणपत्रात अपंगत्वाची टक्केवारी वाढवून देण्यासाठी डॉक्टर ओळखीचे आहेत असे सांगून १० हजार रुपये परस्पर लाच घेणाऱ्या दोन आरोपींना आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली विशेष म्हणजे या आरोपींचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाशी थेट काहीही संबंध नाही .
पारोळा तालुक्यातील कंकराज येथील रहिवाशी ४९ वर्षीय फिर्यादी हाताने दिव्यांग असुन त्यांना हाताचे दिव्यांग प्रमाणपत्र ४० टक्क्यांच्या वर टक्केवारी वाढवुन देऊ शकतो असे आरोपी अनिल तुकाराम पाटील, ( वय-४६, रा.नगरदेवळा, ता.पाचोरा ) यांनी सांगितले होते संबंधित काम ज्या डॉक्टरांकडे आहे, ते डॉक्टर माझे ओळखीचे आहे असे सांगत या आरोपीने पंचासमक्ष १०,०००/-रुपये लाचेची मागणी केली व लाचेची रक्कम स्वतः चोपड्याच्या उप जिल्हा रुग्णालयात पंचासमक्ष स्वीकारली व दुसरा आरोपी विजय रूपचंद लढे ( वय -६७ , व्यवसाय- व्यापार , रा.नगरदेवळा, मारवाडी गल्ली, ता.पाचोरा ) यांचेकडे दिली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने , प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाटील ,पो नि संजोग बच्छाव, स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ . अशोक अहीरे, पो.हे.कॉ. सुनिल पाटील, पो.हे.कॉ. रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना. मनोज जोशी, पो.ना. सुनिल शिरसाठ, पो.ना. जनार्धन चौधरी, पो.कॉ. प्रविण पाटील, पो.कॉ. महेश सोमवंशी, पो.कॉ. नासिर देशमुख, पो.कॉ. ईश्वर धनगर, पो.कॉ. प्रदिप पोळ यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी करून कारवाई केली .