माझा मुलगा पोलीसात,कायदा माझ्या खिशात असे म्हणणाऱ्या पोलीस कस्टडीतील संशयित आरोपी संतोष बडगुजर याच्या सखोल चौकशीची मागणी.भाग(५)

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०८/२०२२
१) चार वर्षांपूर्वी हालाखीची परिस्थिती असलेला संतोष बडगुजर हा लखपती झालाच कसा.
२) संतोष बडगुजर याच्या गुटखा व अवैध सावकारीला पाठबळ कुणाचे.
३) संतोष बडगुजर याच्याकडे काही लोकांनी जीवघेणे विनापरवाना हत्यार पाहिले असल्याचे खात्रीलायक वृत्त.
४) सावकारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनींची झालेल्या खरेदीची चौकशी.
५) माझा मुलगा पोलीसात, कायदा माझ्या खिशात अशी भाषा वापरणाऱ्या संतोष बडगुजर याचे भ्रमणध्वनी रेकॉर्ड काढून याची सखोल चौकशी होणे गरजेचे.
पारीमांडल्य महानुभाव आश्रम, मंदिर व मालमत्ता हडप करण्याच्या कटातील संशयित आरोपी संतोष बडगुजर हाच मास्टर माईंड सखोल चौकशीची मागणी केली जात असून अल्पशा कालावधी लक्षाधीश झालेल्या या संतोष बडगुजरची सखोल चौकशी झाल्याशिवाय त्याला जामीन मिळूच नये अशी मागणी जोर धरत आहे.
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील पारीमांडल्य महानुभाव आश्रम, श्री कृष्ण मंदिर, जामनेर तालुक्यातील मौजे शहापूर येथील महानुभाव आश्रम व भडगाव तालुक्यातील भातखंडे येथील महानुभाव आश्रम व इतर स्थावर मालमत्ता ही रविराज मुकुंदराज येळमकर यांच्या मालकीची असल्यावर ही भातखंडे येथील साधका शिष्य मोहन येळमकर यांनी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र व बनावट मृत्यूपत्र बनवून स्वताच्या नावे करुन घेतल्याबद्दल रविराज मुकुंदराज येळमकर यांनी फिर्याद दिल्यावरुध पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आला असून एकूण पाच आरोपींपैकी तिघांना जामीन तर दोन पोलीस कस्टडीत आहेत.
या गुन्ह्यात तपासाअंती अंबे वडगाव येथील पारीमांडल्य महानुभाव आश्रमाचे महंत रविराज मुकुंदराज यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर व कलम गुन्हा रजिस्टर नंबर २१०/२०२२ भादवी कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७२,१२० व प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पाच संशयित आरोपी मोहन येळमकर (अंबे वडगाव) स्थीत तालुका भडगाव, विजय माधवराव बांधकर. राहाणार मनसर,तालुका रामटेक जिल्हा नागपूर, संतोष शेनफडु बडगुजर (वरसाडे) तालुका पाचोरा, विनोद जयकृष्ण दर्यापूर कर राहाणार करनवाडी तालुका मारेगांव जिल्हा यवतमाळ व नितीन पंडित कुलकर्णी राहाणार भवानी नगर, गिरड रोड पाचोरा या आरोपींना पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांनी चौकशी साठी ताब्यात घेऊन अटक करत पुढील तपासासाठी दिनांक २० ऑगस्ट २०२२ शनिवार रोजी पाचोरा न्यायालयात हजर केले असता वरील पाच संशयित आरोपींपैकी दोन आरोपींना जामीन तर दोन आरोपींना २२ ऑगस २०२२ सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यात पाच आरोपींपैकी नितीन पंडित कुलकर्णी याला अगोदरच जामीन मिळाला असून विजय माधवराव बांधकर व विनोद जयकृष्ण दर्यापूर कर यांना जामीन तर मोहन येळमकर व संतोष बडगुजर यांना २२ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. परंतु संतोष बडगुजर याची सखोल चौकशी झाल्याशिवाय जामीन मंजूर केला जाऊ नये अशी मागणी जनमानसातून केली जाते आहे.
(सीमा सीम खुलजा)
यापैकी संतोष बडगुजर हा व मोहन येळमकर हेच दोघ मुख्य आरोपी असून या कटातील संतोष बडगुजर हाच मास्टर माईंड असल्याचे बोलले जात आहे. कारण संतोष बडगुजर हा मागील चार वर्षांपूर्वी एक सर्वसाधारण व अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जिवन जगणारा व्यक्ती फक्त आणि फक्त चार वर्षातच लोखोची नव्हे तर करोडो रुपयांचा धनी झालाच कसा अशी जोरदार चर्चा व शंका पंचक्रोशीतील सुज्ञ नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
कारण चार वर्षांपूर्वी एकदम हालाखीची परिस्थिती असलेल्या संतोष बडगुजरकडे वरसाडे बुद्रुक येथे तीन मजली भव्य इमारत असून त्यात लाखो रुपयांचे किंमती सामान व सुखवस्तू आहेत. सोबतच एक चारचाकी चांगल्या कंपनीची काळ्या रंगाचे स्वताचे वाहन आहे. विशेष म्हणजे आजही सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत याच्या घराची बारकाईने इन कॅमेरा झाडाझडती घेतल्यास खुप काही आढळून येईल अशी माहिती काही सुज्ञ नागरिकांनी सत्यजित न्यूजकडे कथन केली असून या संतोष बडगुजचा अवैध सावकारीचा व्यवसाय असून याने आजमितीला जवळपास २० शेतकऱ्यांना सावकारी देऊन त्यांच्या शेतजमीन खरेदी करून घेतल्या आहेत. परंतु आजही त्या शेतजमीन संबंधित शेतकरी हेच कसत असून घेतलेल्या रकमेची व सरासरी दरमहा ३ ते ५ टक्के व्याजदराने रक्कम परत केल्यानंतर ही शेतजमीन मुळ मालकाला परत करण्यात येते व ठराविक वेळात रक्कम न ठेवल्यास त्या शेतकऱ्यांच्या शेतावर संतोष बडगुजर हा ताबा घेतो तसेच मोठ्या प्रमाणात भरवशावर सावकारी वाटली असून गुटख्याचा अवैध धंद्यात यांचे मोठे जाळे पसरले असल्याचे असेही खात्रीलायक वृत्त आहे.
आज संतोष बडगुजर याची पोलीस कस्टडी संपणार आहे. परंतु याला जामीन मंजूर झाल्यानंतर गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणातील बरेचसे पुरावे नष्ट करु शकतो म्हणून याला जामीन मंजूर केला जाऊ नये अशी मागणी जोर धरत आहे. संतोष बडगुजर याला जामीन होण्याअगोदर त्याच्या स्थावर, जंगम व चल मालमत्तेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.