सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारितेचा “मापदंड” जोपासणाऱ्या पत्रकारांना सॅलूट!!

प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारितेचा “मापदंड” जोपासणाऱ्या पत्रकारांना सॅलूट!!

By Satyajeet News
January 6, 2022
660
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिनांक~०६/०१/२०२२

“पत्रकारांच्या ओठावर स्मितहास्य असते;परंतु काळजात मात्र अनेक जखमा आणि वेदना जपत पत्रकार पत्रकारिता करीत असतात.”

होय हे अगदी हे सत्य आहे. आणि तेहीअगदीसूर्यप्रकाशाइतके

आज ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस त्यांनी दर्पणच्या माध्यमातून महाराष्ट्रात पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली त्यांच्याच ६ जानेवारी जयंती दिनी महाराष्ट्र राज्यात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या महाराष्ट्राला पत्रकारितेची मोठी परंपरा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल “दर्पणकार”बाळशास्त्री जांभेकर यांच्यासह महात्मा फुले, गो.ग आगरकर, मेघाजी लोखंडे, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

लोकमान्य टिळकांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” अशा प्रकारचे ज्वलजहाल अग्रलेख लिहून ब्रिटिश सत्तेला हादरे दिले. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांच्या व्यथा वेदनांना वाचा फोडून सामाजिक दंभावर जोरदार हल्ले चढवूले आणिअस्पृश्यते विरुद्ध रणसिंग फुंकले.

परंतु हे सगळे करीत असताना पत्रकारितेचे असलेले ‘मापदंड’ त्यांनी पायदळी कधीच तुडवले नाही. परंतु आजच्या घडीला ते मापदंड कितपत पाडले जातात हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. पण असो……. सर्वच पत्रकार पत्रकारितेचे ‘मापदंड’ पायदळी तुडवतात असे नाही! अजूनही नैतिक पत्रकारिता जोपासणारे पत्रकार, संपादक मंडळी आहेच, आणि त्यांच्याच लेखणीच्या जोरावर हा लोकशाहीचा चौथा स्तंभ अजूनही दिमाखात उभा आहे. त्या सर्व पत्रकार मंडळींना आम्ही अगदी मनापासून सॅलूट’ करतो.

कालौघात पत्रकारितेचे स्वरूप बदलले, लेखणीची जागा कम्प्युटरच्या की-बोर्ड घेतली. एका बातमीला किंवा छायाचित्राला दैनिकाच्या कार्यालयापर्यंत जायला तास किंवा दिवस लागायचा आणि दुसऱ्या दिवशी ती वाचकांपर्यं पोहचायची पण आता मात्र काही क्षणात डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत जाऊ लागली, अगोदर प्रत्येक पत्रकारांचे आपले वैयक्तिक सोर्स (खबऱ्यांचे जाळं) असायचं आणि त्यानुसार त्यांच्या लेखणीला धार चढायची; परंतु आता मात्र काही सन्मानिय अपवाद सोडले तर, तसे काही राहिले नाही. त्यांची जागा आता टोळी पत्रकारितेने घेतली आहे. म्हणजे बातमीची आपल्या सोर्सच्या माध्यमातून वैयक्तिक चिकित्सा तथा शहानिशा न करता वातानुकूलिन कक्षात बसून चहाचे झुरके मारत गप्पांमध्ये दंग होऊन बातमी डिजिटल पद्धतीने सर्वांनी वाटून घ्यायची आणि कम्प्युटरच्या माध्यमातून आपल्या मनाचे रंग चढवायचे असंच काहीसं सुरू आहे.

बाळशास्त्री जांभेकरांपासून तर आज पावेतो एक बाब मात्र आहे, तशीच आहे. ती म्हणजे आर्थिक अडचणींची “दर्पण” सुरू झाले तेव्हा सुरुवातीच्या काळात तर, वर्गणीदारच मिळाले नाही. आणि या आर्थिक टंचाईमुळे दर्पण फक्त आठ वर्षे चालू शकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता अशी समाजाला वैचारिक मेजवानी देणारी वर्तमानपत्रे फक्त आर्थिक टंचाईमुळे बंद पडली. आताही तेच आर्थिक दुर्बलतेच्या वेदना उराशी बाळगून बहुतांशी वर्तमानपत्र अजूनही सुरू आहेत. म्हणूनच बातमी पेक्षा, जाहिरातीसाठी पत्रकार बांधवांना तारेवरची कसरत करावी लागते.

आम्ही आमच्या अनेक पत्रकार बांधवांना समाजामध्ये मान, प्रतिष्ठा, पुरस्कारांची त्यांची थैली अगदी शिगोशिग भरलेली असते, परंतु घरात मात्र प्रचंड आर्थिक दारिद्र्य असते. काहींची तर एक वेळ जेवणाची सुद्धा भ्रांत असते. पण पत्रकारिता अंगात इतकी भिनलेली असते की, कुटुंबाचे देखील ते पर्वा करीत नाही. आणि त्यांचं कार्य अव्याहतपणे सुरूच असतं. म्हणूनच आम्हीं लेखाच्या सुरवातीलाच म्हटले की, “पत्रकारांच्या ओठांवर स्मितहास्य असते पण काळजात अनेक जखमा आणि वेदना जपत ते पत्रकारिता ते करत असतात.”

पत्रकारिता क्षेत्रातील अनेक आमचे जिवाभावाचे मित्र आहेत. त्यामध्ये नाव घ्यायचं झालं तर, प्रदीप गायके, प्रवीण सपकाळे, अनिल जैन, शरद कुलकर्णी, मुंबईचे योगेश हेरंब, नरेश बागडे, संजय तांबे सगळ्यांचे नाव घेणे शक्य नाही. यातील यातील सत्यजित न्यूज चे आमचे मित्र दिलीप जैन हे तर पत्रकारिते बरोबर सामाजिक कार्यात देखील अग्रभागी असतात तसेच प्रवीण सपकाळे तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारिता करून नावारुपाला येवून आता स्वतःच्या दैनिकाचे संपादक आहे. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांच्या हिताचे अनेक कार्यक्रम राबवले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य शिबिर ,दीर्घकाळ पत्रकारिता सेवा बजावणाऱ्या ऋषितुल्य पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करणे, महिला पत्रकारांना स्त्रीशक्ती पुरस्कार देणे, हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम, तसेच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी शासनाला निवेदन देणे अशा अनेक कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले जातात. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा पत्रकारितेचा मानबिंदू टिकवून ठेवणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना आम्ही पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो….!
जय हिंद जय महाराष्ट्र!

पोलीस नाईक, विनोद अहिरे
पोलीस मुख्यालय जळगाव
९८२३१३६३९९

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 57
Previous Article

कुऱ्हाड खुर्द येथे ठेकेदाराच्या मनमानीला चाप,पाण्याच्या टाकीचे ...

Next Article

वडगाव जोगे येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पाचोऱ्यात संत रोहिदास जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी किरण जाधव.

    February 10, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा अन्यथा उपोषणाचा इशारा

    November 7, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    “वधू-वर परिचय मेळावे ही काळाची गरज! म्हणून जामनेर येथे होऊ घातलेल्या सकल मराठा समाज मेळाव्यात सामील व्हा” संतोष पाटील.

    December 23, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    नगरसेवक मा.श्री. विकास पाटील यांनी घेतली कोरोनाग्रस्त रुग्णांची भेट.

    April 28, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वरखेडी येथील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान समितीच्या अध्यक्षपदी हेमशंकर तिवारी.

    October 3, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोऱ्यातील तरुणाची समुद्रातील जीवघेण्या लाटांशी आठ तास झुंज;जवान वैभव पाटील यांना आ.किशोर अप्पा पाटील यांनी गौरवले.

    May 26, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारांच्या घोषणापत्रात लपवाछपवी, ग्रामविस्तार अधिकाधिक व जबाबदार अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा.

  • पाचोरा तालुका.

    महसूल खात्याशी दिलजमाई असल्याने वाळू माफिया मस्तावले, म्हणून पोलीस अधिकारी कारवाईसाठी पुढे सरसावले.

  • क्राईम जगत

    ध्वजाचा सन्मान न राखल्याने कुऱ्हाड येथे रास्ता रोको, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज