डॉ. सुरजमलजी झंवर यांचे दुःख निधन.
दिनांक~२९/०१/२०२४
पाचोरा येथील तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यातील पहिले एम. बी. बी. एस. डॉ. अनिल झंवर, सौ. स्मिता यांचे वडील व डॉ. अंकुर झंवर याचे आजोबा डॉ. सुरजमलजी रामदयालजी झंवर यांचे काल दिनांक २८ जानेवारी २०२४ रविवार रोजी सायंकाळी ०५.१५ वाजता वयाच्या ९७ व्या वर्षी वृध्दपकाळाने दुःख निधन झाले.
अंत्य यात्रा:- आज दिनांक २९ जानेवारी २०२४ सोमवार रोजी सकाळी ठिक १०:०० वाजता निजी निवास प्राईम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल देशमुख वाडी येथून निघणार आहे.
*************************************************************
डॉक्टर असोसिएशन पाचोरा, भडगाव, जामनेर.
*************************************************************
डॉ. सुरजमलजी झंवर यांच्या जाण्याने आज वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कारण डॉ. सुरजमलजी झंवर हे पाचोरा, भडगाव तालुक्यातील पहिले एम. बी. बी. एस. डॉक्टर होते. यांच्याकडून प्रेरणा घेऊन तसेच अथक परिश्रम घेऊन त्यांनी डॉ. अनिल झंवर व डॉ. अंकुर झंवर यांना वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षण देऊन आपला जनसेवेचा वसा त्यांच्या हाती दिला आहे. त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचे धडे त्यांनी पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यातील बऱ्याचशा डॉक्टरांना दिले असून त्याचा या वैद्यकीय क्षेत्रात बराचसा फायदा झाला आहे. डॉ. सुरजमलजी झंवर गेल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील एक योग्य मार्गदर्शक हरवल्याने वैद्यकीय क्षेत आज पोरके झाले आहे. ईश्वर स्व. डॉ. सुरजमलजी झंवर यांच्या मृतात्म्यास शांती देवो तसेच झंवर परिवाराला हे दुःख पेलण्याची शक्ती देवो हीच डॉक्टर असोसिएशन कडून ईश्वर चरणी प्रार्थना.