खडकदेवळा हायस्कूलच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी केली विविध कलागुणांची उधळण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१०/०१/२०२४
पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील माध्यमिक विद्यालयात आज दिनांक ३१ जानेवारी २०२४ बुधवार रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि विश्वासराव स्ट्रस्टचे आद्य संस्थापक स्व. श्रीमंत आबासाहेब के. एस. पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करुन मोठ्या उत्साहात स्नेहसंमेलनाला सुरवात करण्यात आली.
या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून सादरीकरण करतांना विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य, नाटिका, एकपात्री अभिनय प्रयोग, गीत गायन, हास्य विनोद अश्या विविध कलागुणांची उधळण करत उपस्थित पालकवर्ग, प्रेक्षकांसमोर आपल्या अंगी असलेल्या कलागुणांची ओळख करुन दिली. विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या कलाविष्काराला भरभरुन टाळ्यांचा प्रतिसाद देत प्रेक्षकांनी विद्यार्थी व या विद्यार्थ्यांकडून पूर्वतयारी करुन घेत त्यांच्या गुणांना वाव देणाऱ्या प्रशालेच्या पर्यवेक्षिका श्रीमती कुंदा पाटील, स्वप्नील पाटील, सी. बी. पाटील, श्रीमती एस. बी. राजपूत मॅडम, विकी बागुल, सागर परदेशी, या शिक्षकांचे कौतुक केले. तसेच प्रशालेचे उपशिक्षक श्री. निवृत्ती बाविस्कर यांनी किशोर कुमार यांनी गायलेले एक गीत मधुर आवाजात सादर केले.
संस्थेचे विश्वस्त श्री. प्रमोद गरुड यांनी प्रास्ताविकातून आपले विचार मांडले. चंद्रकांत पाटील यांनी सुत्रसंचलन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, आर. डी. सुर्यवंशी, एम. जे. पाटील, एन. एन. पाटील, किशोर देशमुख, सुभाष देसले, शरद साळुंखे, अनिल घोडेस्वार, ईश्वर पाटील, सुनील गुजर, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर बंधू-भगिनी यांनी अथक परिश्रम घेतले.
संस्थेचे अध्यक्ष धैर्यशीलराजे पवार, संस्थेच्या सचिव श्रीमती रूपालीताई जाधव, विश्वस्त विश्वजीत पवार, विश्वस्त प्रमोद गरूड, मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा सोनवणे मॅडम व माता-पालक यावेळी उपस्थित होते.