पोलिसांवर हल्ला करणा-यांना आज न्यायालयात हजर करणार, हल्लेखोरांना कठोर शासन व्हावे पंचक्रोशीतील जनतेची मागणी.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/१०/२०२१
अतिक्रमण काढत असतांना कारवाईस विरोध करणा-या दोघांनी पहुर पोलिस स्टेशनचे पो.नि. अरुण धनवडे व पोलिस नाईक दिनेश मारवडकर यांना मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी घडला. लोणी (ता. जामनेर) आरोग्य उपकेंद्राच्या आवारात असलेले अतिक्रमण काढतांना बंदोबस्तकामी पो.नि. अरुण धनवडे त्यांचे कर्मचारी तैनात होते.
यावेळी दत्तात्रय कडूबा उगले व ज्ञानेश्वर कडूबा उगले या दोघा भावांनी पोलिसांसोबत हुज्जत घालत पो.नि. अरुण धनवडे व त्यांचे सहकारी पोलिस नाईक दिनेश मारवडकर यांच्यावर हल्ला केला. याप्रसंगी दोघा उगले बंधूना पोलिस स्टेशनला आणले गेले. अन्य पोलिस कर्मचा-यांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याकामी मदत केली. दोघा उगले बंधूना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.