पहूर पोलिसांची वॉश आऊट मोहीम सुरु, अवैधधंदे करणारांचे धाबे दणाणले.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०३/२०२१
सलग पाचव्या दिवशी अवैध दारू विक्रेत्या वर पी आय राहुल खताळ यांची कारवाई. भराडी परिसरातील २ अवैध दारू भट्या फोडून १२ हजार रुपयांचे कच्चे रसायन जागीच नष्ट. २ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरूच. पहूर परिसरातील अवैध धंद्यांवर कारवाई चे सर्वत्र स्वागत.
पहूर पोलिस स्टेशन मधील पी. आय. राहुल खताळ यांनी कोरोना काळात वाढत्या प्रादुर्भावामुळे अवैध धंद्यांवर धडाकेबाज कारवाई सुरूच ठेवली आहे. सलग पाचव्या दिवशी भराडी येथे कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक २९ मार्च सोमवार रोजी पहुर पो स्टे हद्दीत भराडी गावाचे शिवारात लागुन गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळवुन सकाळीच धरणाकाठी झुडुपांमध्ये एका ठिकाणी ३ फायबर ड्रम मद्ये साठवलेल गा ह भ ६०० लिटर ६,०००।०० दारूचे कच्चे रसायन मिळून आले व ते जागीच नष्ट करून आरोपी विकास मोहन छाडेकर रा. पाळधी
तसेच दुसऱ्या ठिकाणी आरोपी विशाल अरुण छाडेकर यांच्याकडील
३ फायबर ड्रम मद्ये साठवलेल गा ह भ ६०० लिटर ६,०००।०० दारूचे कच्चे रसायन मिळून आले व ते जागीच नष्ट करण्यात आले आहे.
सदरील २ आरोपी यांच्याविरुद्ध पहूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे.
सदर कार्यवाही करतांना पोनि राहुल खताळ, पोहे प्रदीप चौधरी, पोकॉ जितुसिंग परदेशी, अनिल राठोड,होमगार्ड सुरेंद्र पाटील, होमगार्ड महेंद्र पाटील, होमगार्ड दिलीप चव्हाण, देवा इंगळे, रवींद्र चव्हाण या पथकाने कार्यवाही केली आहे.