सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • अनफिट, नादुरुस्त स्कूलबसमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, प्रादेशिक महामंडळाकडून कारवाई अपेक्षित.

  • कायद्याची राहिली नाही भीती, गोळीबार करणाऱ्या आरोपींची जामनेर पोलीसांकडे शरणागती.

  • पाचोरा बसस्थानक गोळीबारातील जखमी आकाश मोरेचा जागीच मृत्यू.

  • पाचोरा बसस्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार, एक गंभीर जखमी.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्कूलबस व दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी.

Uncategorizedराजकीय
Home›कृषी विषयक›Uncategorized›वरखेडी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनलची जोरदार मोर्चेबांधणी व आम्हिच निवडून येनार असल्याचा दावा.

वरखेडी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनलची जोरदार मोर्चेबांधणी व आम्हिच निवडून येनार असल्याचा दावा.

By Satyajeet News
January 9, 2021
819
0
Share:
Post Views: 133
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०१/२०२१
पाचोरा तालुक्यात ९६ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या असून येत्या पंधरा जानेवारी शुक्रवारी मतदान होनार आहे.
यात वरखेडी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनल व ग्रामविकास पॅनल मध्ये समोरासमोर लढत असून दोघेही पॅनलमध्ये मुरब्बी व मार्गदर्शक उमेदवार उभे असल्याने या मोठ्या लोकसंखेच्या बाजारपेठ असलेल गाव असल्याने या निवडणूकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

या निवडणुकीत आपापले पॅनल विजयी होण्यासाठी गावात घरोघरी जाऊन ताई, माई, आक्का, तात्या, भाऊ, जिभाऊ व वडीलधाऱ्या मंडळींना भेटून मतदान करण्यासाठी हात जोडले जात आहेत.
यात मग परिवर्तन पॅनलने आपल्या पध्दतीने प्रचार सुरू केला असून जनतेसमोर आपला जाहीरनामा ठेवला आहे.
यात ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक व्हावा म्हणून प्रत्येक तिन महिन्याला ग्रामसभा घेऊन या ग्रामसभेत शासनाकडून आलेला निधी व झालेली कामे जनतेसमोर मांडण्यात येणार असून याच ग्रामसभेत ग्रामस्थांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
तसेच गावात बेघर लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देणे, गावातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचतगट स्थापन करून बचतगटाच्या माध्यमातून लघुउद्योग सुरु करणे.
गावातील आर्थिक दुर्बल घटक व अल्पसंख्याकासाठी शासनाच्या विविध योजना, सोयी, सवलती मिळवून देत त्यांना कौटुंबिक विकासासाठी मदत करणे.
गावातील जेष्ठ नागरिकांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असून यात गोर, गरिबांना प्राधान्य देण्यात येणार.
गावातील जिल्हापरिषद शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करुन पटसंख्या वाढवण्यासाठी पालकांचे मनपरिवर्तन करणे, मुलांसाठी अभ्यासिका( वाचनालय ) उघडणे.
तरुण मुलांसाठी अद्यावत व्यायमशाळा, तसेच प्रत्येक महिन्याला व्यायामाचे प्रशिक्षण देणारे तसेच स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन करणारे शिक्षक आणून मुलांना मार्गदर्शन करणे.
स्मार्ट व्हिलेज बनवण्यासाठी गावातील परिसर स्वच्छ, सुंदर बनवण्यासाठी सांडपाण्याच्या गटारी भुमिगत करून ड्रेनेजची व्यवस्था करणे.
तसेच उत्तम रस्ते, मुबलक पाणी, शिक्षण व्यवस्था, चांगल्याप्रकारे आरोग्यसेवा पुरवणे तसेच गावात व पंचक्रोशीतील वृक्ष लावून वृक्षतोड थांबवून निसर्गसंप्तीचे संगोपन करणे.
गाव व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे.
असा जाहिरनामा जनतेसमोर ठेवत
वार्ड क्रमांक एक मधून

वार्ड क्रमांक दोन मधून

वार्ड क्रमांक तिन मधून

व वार्ड क्रमांक चार मधून

हे उमेदवारी लढवत असून जोरदार प्रचार करत आम्हीच निवडून येणार असा दावा केला आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

डीजीटल मिडियाच्या युगात प्रिंटींग प्रेसचा व्यवसाय डबघाईला.

Next Article

पहान ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवार यांची ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    भुयारी मार्गाला जलाशयाचे स्वरुप, भडगाव रोड वासियांना सावधानतेचा इशारा.

    September 28, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    वरखेडी भोकर येथे चार वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू

    November 15, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    राज्यात लवकरच ग्रामपंचायतीच्या निवडणूकींचा धुराळा

    October 22, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    जैन साध्वी ज्ञानमती माताजी राष्ट्रपतिभवनात कुसुंबा जैन समाजात आनंदोत्सव.

    November 19, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    मुलाला भ्रमणध्वनीवर कळवत पित्याची आत्महत्या.

    September 19, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    भाजपने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान मोर्चा मुख्यमंत्री घरात तर शेतकरी मॄत्यूच्या दारात उभा आहे

    November 9, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorizedआपलं जळगाव

    भाजपा जळगावच्या भव्य किसान मोर्यात हजारोंच्या संख्येने सामील व्हा (जि.फ.सदस्य मधुकर काटे ) यांचे अवाह

  • आपलं जळगाव

    गरुड महाविद्यालयाच्या रासेयो एकका तर्फे रक्तदान शिबिर संपन्न.

  • आपलं जळगाव

    तारखेडा उपकेंद्र बनले समस्यांचे माहेरघर, रुग्ण फिरत आहेत वाऱ्यावर,सत्यता जाणून घेण्यासाठी रणरणत्या उन्हात कॉंग्रेस पदाधिकारी धडकले.

दिनदर्शिका

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज