नांद्रा प्र.लो येथे श्रीराम नवमी निमित्त रक्तदान शिबिर संपन्न, सुलक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह यांचा स्तुत्य उपक्रम.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०४/२०२२
जामनेर तालुक्यातील नांद्रा प्र. लो. येथे काल श्रीराम नवमी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान श्रेष्ठ दान असे म्हटले जाते. तसेच आजच्या परिस्थितीत रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून या वर्षी सुद्धा तरुणांनी मोठा उत्साह दाखवून भीती न बाळगता स्वेच्छेने रक्तदान केले.
यावेळेस गावातील तरुणांना रक्तदानाचे महत्त्व माणुसकी रुग्णसेवा समूहाचे जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी पटवून दिले, रक्तदानाचे फायदे ,व स्वतः मी २७ वेळा रक्तदान केले आहे असे सांगितले. नांद्रे. प्र लो येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. आधार पाटील, सुनील पाटील, यांनी देखील शिबिराच्या एकदिवस अगोदर गावातील तरुणांशी संपर्क साधून रक्तदान विषयी माहिती विषद केली. रक्तदानाचे उद्घाटन सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्सचे जवान चंद्रकांत गीते, नितीन क्षीरसागर, भिका जाधव ग्रिफ या सैनिकांच्या हस्ते करण्यात आले. भिका जाधव यांनी उद्घाटनाच्या वेळेस स्वतः रक्तदान करून तरुणांना प्रोत्साहित केले.
यावेळेस गावातील तरुण रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले.यामध्ये सुनील पाटील, रामेश्वर कुराडे, कल्पेश पाटील, गणेश मोरे,लक्ष्मण पाटील,दगडू कांडेलकर, गजानन पाटील, आशिष पाटील, बुद्धभूषण खरे, ललित पाटील, राहुल पाटील, भिका जाधव, हरदास पाटील. यांनी रक्तदान केले. रक्त संकलनासाठी रेड प्लस ब्लड बँक जळगाव डॉ.अमोल शेलार,अमोल पाटील,निलेश घोंघडे,यांचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी माणुसकी रुग्णसेवा समूहाचे जिल्हा अध्यक्ष गजानन क्षीरसागर,सरपंच व सामाजिक कार्यकर्ते डॉ आधार पाटील,सुनील पाटील,दिवाकर पाटील. प्रकाश पाटील , डॉ हर्षल पाटील , रघुनाथ पाटील ग्रामपंचायत सदस्य, माणुसकी ग्रुपचे सदस्य आणि इतर अनेक गावकरी मंडळी नांद्रा प्र लो यांनी परिश्रम घेतले.