आपल्या सर्वांचे पितामह आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सहस्त्र चंद्र सोहळा सर्वत्र साजरा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/१०/२०२१
आपल्या सर्वांचे पितामह आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा येत्या१२ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. त्याअनुषंगाने यांचा सहस्त्र चंद्र सोहळा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र साजरा करण्यात आला.
या निमित्ताने आदरणीय रुपालीताई चाकणकर (प्रदेश अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या मार्गदर्शनाखाली जळगांव (ग्रामीण) महिला राष्ट्रवादीच्या वतीने आज रोजी विकास विद्यालय कळमसरे येथील शाळेतील विध्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.
शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करुन सौ. वंदनाताई चौधरी यांनी दिलखुलास गप्पा मारत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या यावेळी विद्यार्थ्यांच्या मनात सकारात्मक उर्जा निर्माण होऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
या वेळी गावाचे सरपंच मा. श्री. अशोक दादा चौधरी , शाळेचे चेअरमन श्री. शिवाजी घूले , कैलास चौधरी, नाना बोखरे , नाना पाटील, रामा कोळी ,दीपक जोहरे, गणेश पांडव , सातदिवे , आणि सर्व शिक्षक वृंद , ग्रामस्थ व महिला पालक वर्ग उपस्थित होते.
सौ. वंदना अशोक चौधरी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस जळगांव यांनी हा कार्यक्रम घेतल्याबद्दल शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले.