चिंचपूरे येथील कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेतर्फे वृक्षरोपण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०७/२०२१
१ जुलै कृषी दिनाच्या निमित्ताने
कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्रराज्य यांच्या कडून कृषी सप्तहः निमित्ताने कृषी पदवीधर संघटना पाचोरा यांच्या सहभागाने जिल्हा परिषद शाळा चिंचपुरे तालुका पाचोरा येथे वृक्षरोपनाचा कार्यक्रम आज दिनांक ४ जुलै रविवार रोजी साजरा करण्यात आला.
या निमित्ताने कृपयुसं पाचोरा यांच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे शाल.फुलगुच्छ व सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी पाचोरा सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक अधिकारी श्री वानखेडे साहेब तसेच पाचोरा कृषि विभागाचे कृषी सहाय्यक श्री संतोष चव्हाण साहेब,बाँबरुड राणीचे येथील आदर्श शेतकरी श्री मयूरभाऊ वाघ,सरपंच श्री हुसेनदादा तडवी,कृषि पदवीधर संघटनेचे पाचोरा तालुका अध्यक्ष तथा उपसरपंच शिवश्री सचिनभाऊ कोकाटे पाटिल,मुख्याध्यापक श्री देसले सर,ग्रामपंचायत सदस्य शरद पाटील ,आबा पाटील,गणेश पवार,पंकज पाटील,गोपाळ पाटील,गणेश पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी तालुका अध्यक्ष तथा उपसरपंच सचिन भाऊ यांनी तालुक्यातील सर्व शेतकरी तसेच परिसरातील लोकांनी वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला.