वैद्यकीय तथा सामाजिक कार्याबद्दल मराठा सेवा संघ जामनेर तर्फे डॉक्टर सागर दादा गरुड यांचा जाहिर सत्कार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०७/२०२१
कोरोना महामारी च्या काळात गोरगरिबांसाठी देवदूत ठरलेले डॉ. सागर दादा गरुड, संचालक, विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पाचोरा यांनी जामनेर तालुक्यातील गरजूंसाठी राबविलेली मोफत व निशुल्क भोजन उपक्रमानिमित्त मराठा सेवा संघ जामनेर तर्फे आज दिनांक २५ जुलै रोजी शिवश्री विनोद पाटील सर यांच्या निवासस्थानी दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी डॉ. सागर दादा गरुड यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी मराठा सेवा संघ परिवाराच्या वतीने तालुकाध्यक्ष माननीय शिवश्री योगेश पाटील सर,तालुका सचिव माननीय शिवश्री दीपक ढोणी सर,तालुका कार्याध्यक्ष माननीय शिवश्री विनोद पाटील सर यांच्या शुभहस्ते दादांचा भव्य सत्कार करण्यात आला.
तसेच ग. स. सोसायटीचे माजी संचालक माननीय शिवश्री अनिलभाऊ गायकवाड,अमित उंबरकर सर,डॉ.पी.आर.पवार, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी माननीय जुगलकिशोर ढाकरे, गोपाळ समाजहित महासंघाचे जिल्हाध्यक्ष माननीय ग्यानदेव गोपाळ सर, तालुका सचीव गणेश गोपाळ सर यांनीही दादांचा भव्य सत्कार केला. यावेळी दादांनी कोरोना काळात राबविलेल्या मोफत जेवणाचा डबा उपक्रमाबद्दल सर्वांनी दादांचे कौतुक केले. तसेच गोरगरीब जनतेसाठी करीत असलेल्या कार्याचेही सर्वांनी कौतुक केले.
तसेच भावी वाटचालीसाठी सर्वांनी दादांना शुभेच्छा दिल्या.यावेळी सागरदादा गरुड मित्र परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.