अंबे वडगाव येथे स. पो. निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे साहेब यांच्या हस्ते आठवडे बाजाराचा शुभारंभ संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०५/२०२२
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथे दिनांक ८ मे २०२२ रविवार रोजी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे साहेब यांच्या हस्ते दुकानाची पुजा करुन दुकानदाराचा सत्कार करत श्रीफळ वाढवून आठवडे बाजाराचा शुभारंभ करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अंबे वडगाव, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक, कोठडी तांडा व वडगाव थोडे हि पाचही गावे संयुक्त ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येतात या पाचही गावांसाठी दैनंदिन व्यवहार व संसारपयोगी वस्तू खरेदीसाठी वरखेडी किंवा शेंदुर्णी येथील आठवडे बाजारत धावपळ करत जावे लागत होते. तसेच याठिकाणी जाऊन बाजार करण्यासाठी अंबे वडगाव ते शेंदुर्णी किंवा वरखेडी मिळेल त्या वाहनाने प्रवास भाडे खर्च व यात वेळ ही वाया जात होता.
अंबे वडगाव चे सामाजिक कार्यकर्ते सुनील निकम यांनी ही अडचण लक्षात घेऊन ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थांमध्ये चर्चा घडवून आणत आपल्या गावात प्रत्येक रविवारी आठवडे बाजार भरवण्याचा एकमताने ठराव करुन तो अमलात आणण्यासाठी अंबे वडगाव जवळील गावागावात जाऊन तसेच बाजारपेठेत जाऊन जाहीर निवेदन देऊन येत्या ८ मार्च २०२२ पासून अंबे वडगाव येथे आठवडे बाजार भरवण्यात येणार असल्याचे जाहीर करत या बाजारात आपापल्या व्यवसायाची दुकाने लावण्यासाठी सुचित केले होते.
या सुचनेनुसार ८ मे रविवार रोजी विविध व्यवसायीकांनी आपली दुकाने थाटून बाजारात हजेरी लावली होती. अंबे वडगाव येथे आठवडे बाजाराचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते नुकताच करण्यात आला असून प्रसंगी आठवडे बाजाराचे उदघाटक सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांचा सत्कार मा. श्री. मिलिंद भुसारे, पोलिस हेड कॉन्स्टेबल मा. श्री. रणजित पाटील यांचा सत्कार मा. श्री. शशिकांत वाघ व पोलीस हेड कॉन्स्टेबल मा. श्री. मोरे दादा यांचा सत्कार वाल्मीक देवरे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी राजेंद्र देवरे, मंगेशराव खैरनार, संतोष निकम, गजानन चंद्रे बहुसंख्य ग्रामस्थ व बाजारात आलेले सर्व व्यावसायीक, दुकानदार उपस्थित होते. या आठवडे बाजार भरवण्यासाठी सुनील निकम यांनी विशेष परिश्रम घेतले.