देवीची ज्योत घेऊन येतांना मात्र स्वताची प्राणज्योत मालवली. शेंदुर्णी गावावर शोककळा.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/१०/२०२१
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील सुनील वाघमारे वय (१८) वर्षे हा नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापनेसाठी देवीची ज्योत घेण्यासाठी सप्तशृंगी गडावर गेला होता. गडावरून देवीची ज्योत घेऊन परत येतांना हा तरुण चाळीसगाव तालुक्यातील वाघळी शिवारातील बंधाऱ्यात अंघोळीसाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन जलतरण पटू बोलावून मृतदेहाचा शोध सुरु केला आहे. बातमी लिहून होईपर्यंत मृतदेह मिळून आलेला नव्हता.
या घटनेमुळे शेंदुर्णी गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.