ऐकावे ते नवलच, कुऱ्हाड गावात पोलिसांवर पाळत ठेवण्यासाठी, अवैधधंदे करणारांनी रस्त्या,रस्त्यावर ठेवले खबरी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/१०/२०२१
आज पर्यंत आपण अवैधधंदे किंवा गावपातळीवर व समाजात शांतता भंग होईल किंवा समाजविघातक घटना घडू नयेत म्हणून माहिती मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून गावागावात खबरी ठेऊन माहिती जाणून घेत होते व लगेचच योग्य कारवाई होते यामुळे बऱ्याचशा घटनांना आळा बसत होता व आजही बरेचसे गुन्हे उघडकीस येण्यामागे या गुप्त खबरींची भूमिका महत्त्वाची ठरत असते.
परंतु कुऱ्हाड गावातून महिलावर्ग व सुज्ञ नागरिकांनी अवैधधंदे बंद होण्यासाठी सत्यजीत न्यूजला संपर्क साधून अवैधधंदे बंद व्हावेत म्हणून अवैधधंद्याचे विरोधात आवाज उठवत अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पिंपळगाव पोलिस स्टेशनला विनंती करत साकडे घातले होते.
याची दखल घेत दिनांक ११ऑक्टोबर सोमवार रोजी सत्यजीत न्यूज कडून (कुऱ्हाड गावात अवैधधंदे करणारांमध्ये गॅंगवार होण्याची शक्यता, वेळीच पायबंद घालण्यासाठी कुऱ्हाड ग्रामस्थांचे पोलीसांना साकडे.) या शिर्षकाखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.
याची दखल घेत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये यांनी या वृत्ताची दखल घेत ११ ऑक्टोंबर सोमवारी सकाळपासूनच कारवाईचा धडाका सुरू केल्याने अवैधधंदे करणारांच्या पायाखालची वाळू सरकून धाबे दणाणले आहे.
पिंपळगाव पोलिसांनी सुरु केलेल्या या कारवाई बद्दल कुऱ्हाड गावपरिसरातुन पोलिसांचे अभिनंदन केले जात असून ही कारवाई सतत सुरु ठेवून कुऱ्हाड गावातील अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
परंतु दुसरीकडे पोलीस कारवाई पासून आपला बचाव करण्यासाठी अवैधधंदे करणारांनी संघटित होऊन रोजंदारीवर माणसे लावून कुऱ्हाड ते वरखेडी, कुऱ्हाड ते पाचोरा, कुऱ्हाड ते अंबे वडगाव, कुऱ्हाड ते लोहारा व कुऱ्हाड ते कळमसरा या रस्त्यावर खबरी नेमले असल्याचे खात्रीपूर्वक बोलले जात आहे.
हे नेमलेले खबरी कुऱ्हाड गावाकडे पोलीस येतांना आढळल्यास भ्रमणध्वनीवरून त्वरित अवैधधंदे करणारांना कळवतात व त्यांना सजग करतात या कारणास्तव पोलिसांनी अवैधधंद्याच्या उघडलेली मोहीम यशस्वी होत नसल्याचे दिसून येते.
आजपर्यंत पोलीस गुप्त माहिती मिळवण्यासाठी विश्वासू खबऱ्यांची नेमणूक करतात असे ऐकले होते. परंतु आता चक्क अवैधधंदे करणारांनीच पोलिसांवर पाळत ठेवण्यासाठी गुप्त खबरी नेमल्याने कुऱ्हाड गावात हा चर्चेचा विषय ठरला असून प्रकारामुळे (ऐकावे ते नवलच) असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
(क्रमश~ पुढील भागत)
अवैधधंदे सुरु रहावेत म्हणून कुऱ्हाड गावातील अहित चिंतकांची धडपड.