कुसुंब्याहून दिगंबर जैन मुनिश्री यांचा २३ ला मांगीतुंगी जी मार्गे कोल्हापूर कडे मंगल विहार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/११/२०२१
कुसुंबा येथील चातुर्मास संपवून तपस्वी प.पु. श्री १०८ सुदेह सागरजी महामुनीश्री दिनांक २३ नोव्हेंबर मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता स्वाध्याय भवन येथून मांगीतुंगीजी, सटाणा, मालेगाव, औरंगाबाद, उस्मानाबाद मार्गे कोल्हापूर कडे मंगल विहार होणार आहे.
त्यासाठी पार्श्वनाथ सेवा समितीचे, पद्मावती युवा मंच यांनी मंगल विहाराची जय्यत तयारी केली व त्यांचा उत्साह वाखण्याजोगा होता अशी माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धीप्रमुख सतीश वसंतीलाल जैन यांनी दिली.
पूज्य श्रींचे दुपारी प्रवचन होईल नंतर गावातील प्रमुख मार्गावरून प्रस्थान करतील. वर्षा योगाच्या काळात समाजात एक नवीन प्रेरणा जागृत झाली. शाश्वत सुखाचा मार्ग सांगितला आगळेवेगळे चैतन्य निर्माण झाली. बालकांमध्ये नैतिकता व सद्गुणांचे बीज पेरले गेले. आत्मबळ वाढविण्यासाठी एक उत्तम अशी वेळ काळ होती. सतसंघात राहिल्याने अनेक जणांमध्ये आमुलाग्र परिवर्तन घडून आले. मुनिश्रींच्या कुसुंब्यात असण्याला अलौकिकाचे चे वरदान लाभले होते.
चातुर्मास हे पुण्य पावन सोहळाच होता. पूज्यश्री यांच्या सानिध्यात चार महिने विश्वात सुख-समृद्धीसाठी प्रतिदिन शांतीधारा अभिषेक चे व्हाट्सअप, फेसबुक द्वारे पाच हजार भाविक अलभ्य लाभ घेत होते. तसेच या चातुर्मासात जवळ जवळ विविध भागातून दर्शनार्थींनी पूज्यश्रींचा आणि अतिशय क्षेत्राचे पंधरा हजार श्रध्दाळुंनी महत्त्वाची भूमिका बजावली. चातुर्मास समितीच्या सदस्यांच्या अथक परिश्रमाने चातुर्मास घडवून आणल्यामुळे दर्शनार्थी या मंच धन्यवाद देत हर्षोल्लासाने परतत होते.