सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›नदीच्या पुरात वाहून मृत्यू पावलेल्या तरुणाच्या वारसाला ४ लाखांच्या धनादेशाचे वाटप आ.किशोर अप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश.

नदीच्या पुरात वाहून मृत्यू पावलेल्या तरुणाच्या वारसाला ४ लाखांच्या धनादेशाचे वाटप आ.किशोर अप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश.

By Satyajeet News
October 6, 2021
434
0
Share:
Post Views: 36
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/१०/२०२१

अवघ्या पंधरा दिवसात मदत आमदार मा.श्री किशोर अप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश.

सततच्या पावसामुळे तसेच घाटावरील सोयगाव बानोटी आदि भागातील नद्यांचे वाहून येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे हिवरा नदीला आलेल्या पुरातून वाट काढत कृष्णापुरी मधील आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास वाहून गेलेल्या धनराज शिंपी वय ४० हा तरुण वाहून गेल्याची घटना घडली होती. त्याच्या वारसांना शासनाच्या नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत चार लाखाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.

पाचोरा शहरातून वाहत जाणाऱ्या कृष्णापुरी येथील हिवरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात कृष्णापुरी भागातील शिवकॉलनी मधील युवक देवेंद्र धनराज शिंपी वय ४० हा युवक २२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातून कृष्णापुरीकडे जाण्याच्या प्रयत्नात असतांना पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याची घटना घडली होती.दरम्यान स्थानिक नागरिक व प्रशासनाने त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह तब्बल आठवड्याभरा नंतर कुजलेल्या अवस्थेत सापडला होता.

सदर युवक रात्री पाऊस जास्त असल्याने व नदीला जास्त पूर असल्याने नदी पार करून जाणे अडचणीचे असल्याने शहरातच रात्री नातेवाईकाकडे मुक्कामी थांबला होता. सकाळी सुमारे ६.३० च्या सुमारास गावातून घराकडे शिव कॉलनी, कृष्णपुरी कडे येत असताना पुलावरील पाणी अचानक पाणी वाढल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे या युवक पाण्याचया प्रवाहात वाहून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली होती.

दरवर्षी होणाऱ्या अशा घटनांमुळे व स्थानिक नागरिकांना व शहरवासीयांना होणाऱ्या गैरसोयीची दखल घेत आ.किशोर अप्पा पाटील यांनी याठिकाणी सुमारे १८ कोटीं रुपयांचा निधी आणत परिसरातील तीन पुलांचे काम सुरू केले आहे. मात्र या कामास अजून सुमारे वर्षभर कालावधी लागणार असल्याची माहिती आहे.अवघ्या पंधरा दिवसात बाधित कुटुंबाला मदत मिळाल्याचे समाधान कुटुंबियांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

तहसील कार्यालयात बुधवारी दुपारी ३ वाजता झालेल्या या कार्यक्रमात शिवसेनेचे मुकुंद अण्णा बिल्दिकर, शहर प्रमुख किशोर बारावकर, जिल्हा उप प्रमुख ऍड. अभय पाटील, नगरसेवक सतिश चेडे, नगरसेवक बापू हटकर, बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. हरीभाऊ पाटील, माजी नगरसेवक गंगाराम पाटील, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, नगरसेवक विकास पाटील, तहसीलदार कैलास चावडे यांच्या हस्ते चार लाखांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रवीण ब्राह्मणे, भूषण पेंढारकर, यांचेसह महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.दरम्यान शासन सर्व प्रकारच्या नैसर्गीक आपत्तीत जनतेच्या पाठीशी असून काही दुर्दवी घटना घडल्यास जनतेने तात्काळ प्रशासनाला संपर्क करण्याचे आवाहन मुकुंद अण्णा बिल्दिकर यांनी केले आहे.

संततधार पावसामुळे युवक वाहून गेल्याची माहिती मिळताच आ.किशोर अप्पा पाटील यांनी तात्काळ सदर युवकाचा शोध घेण्याचे आदेश प्रशासनास दिले होते. दरम्यान सदर युवक सापडून न आल्याने अखेर त्यास मृत गृहीत धरत मदतीसाठीचा प्रस्ताव शासनदरबारी सादर करण्याचा सूचना प्रशासनास दिल्या होत्या त्या अंतर्गत महसूल प्रशासनाने देखील तत्परता दाखवत तात्काळ प्रस्ताव सादर केल्याने अवघ्या पंधरा दिवसातच शासकीय मदत मिळाली.यासाठी तहसीलदार कैलास चावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील, शहर तलाठी आर डी पाटील लिपीक अमोल भोई यांनी विशेष परिश्रम घेतले .

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटलांचा पाठपुरावा, आपत्तीग्रस्तांना शासकीय ...

Next Article

देवीची ज्योत घेऊन येतांना मात्र स्वताची प्राणज्योत ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पाचोरा शहरात वॅक्सिन उपलब्ध मात्र यंत्रणा अपूर्ण, कॉंग्रेस मैदानात.

    May 7, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मनसेचे प्रशांत पाटील यांचे आंदोलन यशस्वी.

    October 7, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा येथील गजानन पेट्रोलियम पासून, ‘डिझेल अँट युवर डोअर स्टेप’ चा शुभारंभ.

    August 8, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    चिंचपूरे येथील कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेतर्फे वृक्षरोपण.

    July 7, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    ज्येष्ठ शाहीर शिवाजीराव पाटील यांना जळगाव येथे लोककला विकास प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार पालकमंत्री यांच्या हस्ते प्रदान.

    February 21, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

    November 13, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    छावा संघटनेतर्फे पहूर येथे लहान मुलांना शालेय साहित्याचे वाटप.

  • पाचोरा तालुका.

    शेतकरी सहकार विकास पॅनलचा एकच ध्यास, संस्थेचा सर्वांगीण विकास.

  • प्रासंगिक

    एका बाजूला लाडक्या बहिणींचा वेगळाच थाट दुसरीकडे मात्र बॅंकांमध्ये खडखडाट पैशाअभावी जीवनावश्यक कामे रखडली.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज