छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सिने अभिनेत्री आसु सुरपुर यांचे बार्शी शहरात आगमन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०२/२०२२
बार्शी शहरात राजमाता इंदुताई आंदळकर अन्न छत्रालय देवणे गल्ली येथे सालाबादप्रमाणे दरवर्षी आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरी केली जाते मात्र यावर्षी कोरोणा काळात शासनाचे नियम पाळून महाराजांची जयंती साजरी करण्यात येणार आहे.
या जयंती निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून अल्पावधीतच आपल्या अभिनयातून तरुणाई पासून तर लहान थोर मंडळीच्या मनामनात स्थान मिळवणारी अभिनेत्री आसु सुरपुर यांना बार्शी शहरात आमंत्रित करण्यात आले असून त्यांचे मुंबई येथून आगमन होणार आहे. नंतर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन व माल्यार्पण करण्यात येणार आहे.
सिने आभिनेत्री आसु सुरपुर यांचे मुंबई येथून दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ शनिवार रोजी प्रमुख गल्ली बार्शी आगमन झाल्यानंतर प्रमुख मान्यवर व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सकाळी ठीक ११ वाजून ३० मिनिटांनी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
यानिमित्ताने मंत्री मा.श्री. दिलीप रावजी सोपल साहेब, शिवसेना मा.श्री. भाऊसाहेब आंधळकर शहर प्रमुख शिवसेना मा.श्री. दीपक भैय्या आंधळकर बार्शी नगरपालिका विरोधीपक्षनेते मा.श्री. नागेश अक्कलकोटे मा.श्री. मनीष दादा चव्हाण नगरसेवक मा.श्री. बापू जाधव, ऍडव्हाकेट सुप्रिया ताई शेखर,मा. श्री. गुंड पाटील जिल्हा अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा यांची प्रमुख उपस्थिती रहाणार असून या कार्यक्रमाला सगळ्या शिवप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक सगीर भाई सय्यद इलियास, भाई शेख संतोष भाऊ सचिन धावारे, आखिल भारतीय चित्रपट मराठी निर्माता महाडळाचे उप आध्यक्ष महाराष्ट्र राज्य संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे यांनी केले आहे.