वरखेडी , भोकरी शिवारातुन विद्यूतपंपाची चोरी

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=१६/११/२०२०
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी शेतशिवारातुन दिनांक १६ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास शेख रज्जाक शेख अमीर कहाकर ( मौजे भोकरी गट नंबर ५३) ,शेख अब्दुल रहेमान अमिर कहाकर (मौजे भोकरी गट नंबर ५९), हारुन इमाम काकर ( मौजे भोकरी गट नंबर ५५), जुबेदाबी अब्बास काकर , शानुरबी रशीद काकर यांच्या विहिरीवरील विद्यूतपंप कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना सकाळी शेतकरी शेतात गेल्यानंतर लक्षात आल्यावर त्यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल केली असून पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस करीत आहेत.
आपल्या गाव व शेतशिवारात शेतकऱ्यांनी आपल्याले विद्यूतपंप ,शेतीअवजारे व पशुधन हे चोरी जाणार नाही याची काळजी घ्यावी तसेच आपल्या गावपरिसरात कींवा शेतशिवारात दिवसा कींवा रात्री कोणी अनोळखी इसम फिरतांना आढळून आल्यास त्याची चौकशी करणे काही संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना कळविणे तसेच अधिक सुरक्षेसाठी संबंधित व्यक्तीचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेणे असे उपाय केल्यास चोऱ्यांचे प्रमाण कमी होईल कींवा चोरी झालीच तर तपासकामी पोलिसांना मदत होईल असे आवाहन व मार्गदर्शन पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी केले आहे.