जामनेरचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे साहेब यांचे निर्भिड पत्रकार संघ जामनेर यांच्या वतीने प्रमाणपत्र व ट्राॅफी देवुन सत्कार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/१०/२०२१
जामनेर पोलीस स्टेशनला नव्यानेच रुजु झालेले पोलिस निरीक्षक मा.श्री. किरण शिंदे साहेब यांनी जामनेर पोलीस स्टेशनचा पदभार स्विकारत महिनाभरातच अवैध धंद्यावाल्यांच्या विरोधात वॉश आऊट मोहीम राबवून पळता भुई थोडी केल्याने जामनेर शहरासह तालुक्यातील अवैधधंदे करणाऱ्यांनी धसका घेतला असून अवैधधंदे करणारांचे धाबे दणाणल्याने अवैधधंद्यांत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
या बेधडक व सडेतोड कारवाई बाबत जामनेर शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी मा.श्री. किरण शिंदे यांचे चपराक देण्याची जणूकाही मोहिमच सुरू केली आहे त्यांच्या का कार्याचा नागरिकांमधून स्वागत केले जात आहे.
बनावट आयडि रॅकेट, अवैध बायोडिझेल, गावठि दारूच्याभट्ट्या (उद्ववस्त)प्रकरण उघड करून गुन्हेगारांना कायद्याचा मोठा झटका दिला आहे.
पोलीस निरीक्षक किरण शिंदे साहेब यांनी महिनाभरात केलेल्या कारवाई ची दखल घेत आज जामनेर पोलिस स्टेशन येथे निर्भिड पत्रकार संघ जामनेर यांनी प्रमाणपत्र ,ट्राॅफि देवुन स्वागत केले.
यावेळेस जिल्हाध्यक्ष सुनिल इंगळे,सचिव दादाराव वाघ, प्रसिद्धी प्रमुख अनिल शिरसाठ,महिला तालुकाध्यक्ष मिना शिंदे, राहुल इंगळे, अभिमान झाल्टे,नितिन इंगळे, मच्छिद्र इंगळे उपस्थित होते.