दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०१/२०२३

सावित्रीबाई फुले व जिजामाता यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त एस. एन. ऑनलाईन सर्व्हिसेस व झेरवाल अकॅडमी तसेच गृप ग्रामपंचायत अंबे वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अंबे वडगाव येथे आज दिनांक ०७ जानेवारी २०२३ शनिवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर पोलिस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे साहेब, प्रा. मा. श्री. राजेंद्र चिंचोले सर, प्रा. या. श्री. देविदास सावळे सर व कायदेतज्ज्ञ ॲड. मा. श्री. अभयदादा हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी पंचक्रोशीतील गावातील होतकरु तरुण, तरुणींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.