असे झिरपते सेवेचे व्रत…. राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०८/२०२१
बच्चूभाऊ कडू हे नाव सर्वपरिचित आहे. भाऊंचे बरेचसे किस्से खेड्यापाड्यात गावचावडीवर किंवा बैठकीत ऐकायला येतात. असाच एक अवलिया भाऊंन बद्दल पुरुषोत्तम आवारे पाटील
पत्रकार अकोला यांनी लिहिलेले दोन शब्द आपल्यासमोर ठेवत आहे.
बच्चूभाऊ कडू आज राज्यमंत्री आहेत पण गेली ३० वर्ष काय होते ? बेलोरा ग्राम पंचायत सदस्य,चांदुर पंचायत समिती सभापती ते राज्यमंत्री या तीन दशकांच्या ग्रामीण प्रवासात या माणसाने अनुभवाची जशी असंख्य गाठोडी बांधून ठेवली आहेत तशीच सेवा कार्याचे पेव खोदून ठेवले आहेत.
जे सुचलं त्याची काहीही करून अंमलबजावणी करायची ,लोक काय म्हणतील यापेक्षा आपण ज्याच्यासाठी करतोय त्याचे समाधान महत्वाचे मानत या माणसाचा प्रवास सुरु आहे.आजच्या घडीला प्रहार जनशक्ती पार्टीचा परीघ राज्य अन बाहेरही वाढत आहे.बच्चूभाऊ कडू यांच्यात ठासून भरलेला देशभक्ती जूनून आणि सेवा कार्याचे भारलेपन हजारो लोकांना प्रेरणा देते.हा नेता गोरगरिबांचा बच्चू भाऊ असला तरी पक्षात येणाऱ्या व असणाऱ्या लाखोंचा नेता आहे.
बदल,परिवर्तन,प्रारंभ हे सगळं वरून झिरपत खाली येत असते,त्यासाठी वर बसणारी माणसं दिशादर्शक असली पाहिजेत.कोणत्याची पक्षाच्या नेत्याने केलेली कृती खाली काम करणार्यांना शिकवण असते,लोक नेत्याचा आदर्श घेऊन चालत असतात.परवा स्वातंत्र्य दिनी बच्चूभाऊनी अकोल्यात शहिदांच्या परिवाराचे जे आदरातिथ्य केले तो सेवेचा परमोच्च बिंदू होता.देशाच्या रक्षणार्थ छातीवर गोळ्या झेलून प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांच्या माता,पिता या वीरांपेक्षा कुठेही कमी नाहीत,
काही महिने लळा लागलेला प्राणी अचानक सोडून गेला तर लोक सैरभैर होतात अशावेळी पोटचा गोळा शवपेटीत बंदिस्त होऊन आणला जातो त्यावेळी आईची मनस्थिती काय असेल हे आई झाल्याशिवाय कळू शकत नाही,हे आईपण समजून घेण्याचा छोटासा प्रयत्न करणं बच्चू कडूला कसे सुचते ? हा आजच्या राजकारणातील मोठा प्रश्न आहे.नेता जो उपक्रम राबवतो तो आपणही राबवला पाहिजे अशी प्रेरणा होणे सध्या दुर्मिळ झाले आहे ,पण काही लोक आहेत नेत्याचे अनुकरण करणारे….
भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी त्यातलेच अग्रभागी असणारे नाव.रावेर मतदार संघात अपक्ष उभा राहून ४५ हजार मतदान घेणाऱ्या या माणसाला कुठेही गर्वाची बाधा झाली नाही,बच्चूभाऊना प्रहार साठी जे दोन अनिल मिळाले त्यात अनिल गावंडे नंतर हे दुसरे अनिल चौधरी.. इकडे अकोल्यात बच्चूभाऊ अमर शहिदांच्या कुटुंबाला छातीशी कवटाळून कर्तव्य बजावत असताना त्याचवेळी अनिल चौधरी भुसावळ मध्ये शहिदांच्या परिवाराला आम्ही सोबत असल्याचा धीर देत होते. या उपक्रमाचे कदाचित काहीही राजकीय मायलेज नसेल पण कशातही मायलेज शोधणाऱ्या मतलबी लोकांचा हा पक्ष नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे.
बच्चूभाऊ जो माणुसकीचा गहिवर करताहेत त्या दिशेने चालणारा एक प्रहार सेवक अनिल चौधरी यांच्या रूपाने खान्देशात निघाला,उद्या प्रत्येक भागात, जिल्ह्यात,गावोगाव तयार होतील याची खात्री आहे.
-पुरुषोत्तम आवारे पाटील
पत्रकार अकोला
संवाद -9892162248