उप्पलखेडा सुतांडा/अंतुर येथे सोडियम हायड्रोक्लोराइडची फवारणी .
प्रज्वल चव्हाण (गोंदेगाव ता.सोयगाव)
दिनांक~२३/०४/२०२१
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उप्पलखेडा सुतांडा/अंतुर ग्रामपंचायतने कसोशीने प्रयत्न सुरू केले असून कोरोना गावात येऊ नये यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे.
त्या अनुषंगाने गावात सर्वांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे या करिता गावात वेळोवेळी दवंडी देऊन कोरोना विषयी माहिती दिली जात आहे . दि.२३/०४/२१ रोजी गावातील सर्व गल्लीबोळात सोडीयम हायड्रो क्लोराईड फवारणी करण्यात आली. गावातील सर्व शासकीय कर्मचारी व आरोग्य समिती यासाठी प्रयत्नशील असून ग्रामपंचायतीला सहकार्य करत आहे. सोडियम हायड्रोक्लोराईची फवारणी ट्रॅक्टरची च्या सहाय्याने केली जात आहे.
आरोग्य सेवक,आशाताई अंगणवाडी सेविका याचे दररोज गावात कोरोना विषयी जनजागृती करण्याचे मोलाचे कार्य चालू आहे .
याकामी उपस्थित जि.प.समाजकल्याण सभापती मोनाली पिता राजेंद्र राठोड ,सरपंच सविता अभयसिंग पवार , उपसरपंच रामदास हरलाल राठोड, अभयसिंग जोरसिंग पवार, ग्रामसेवक राजेश ढेपे साहेब ,लक्ष्मण सुभाष पवार, शिवदास उखा चव्हाण, अरविंद भरतसिंग पवार ,कडू हिरासिंग पवार,श्याम सुभाष भावसार, गोटू श्रावण पवार,राधा श्याम चव्हाण, CRP महिला बचत गट व ग्रामस्थ मंडळी व उप्पलखेडा ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. कोरोनाला हरवण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी मास्क वापरावा, घरातच थांबावे, बाहेर जाणे टाळावे असे आवाहन उप्पलखेडा सुतांडा/अंतुर ग्रामपंचायत केले आहे.