श्री. अंबिका देवीचा यात्रा उत्सव रद्द.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०४/२०२१
पाचोरा तालुक्यातील आंबे वडगाव येथील जागृत देवस्थान श्री. अंबिका देवीचा यात्रा उत्सव सालाबादाप्रमाणे गुढीपाडव्याला साजरा केला जातो. परंतु मागील वर्षापासून कोरोनाचे संकट ओढावल्यानंतर याचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी सामाजिक अंतर राखने म्हणजेच (मानवी साखळी खंडित करणे) हा एकमेव चांगला उपाय आहे.
म्हणून शासनाने कोरोनाचा सामना करण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून यात्रा उत्सव, लग्न समारंभ, मेळावे, विविध स्पर्धा, आठवडे बाजार या कार्यक्रमावर बंदी घातली असल्याने या वर्षी सुद्धा श्री. अंबिका देवुचा यात्रा उत्सव बंद ठेवण्यात आलेला आहे.
म्हणून येत्या १३ एप्रिल मंगळवार रोजी गुढीपाडवा असून या दिवशी श्री अंबिका देवीचा यात्रा उत्सव येतो परंतु शासनाच्या नियम व अटी नुसार सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून यात्रा उत्सव रद्द करण्याचे आदेश असल्याने यावर्षीही अंबिका देवीचा यात्रा उत्सव साजरा होणार नसल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या भाविक भक्तांनी याची नोंद घेऊन कोणीही दर्शनासाठी किंवा नवस फेडण्यासाठी येऊ नये असे आवाहन आंबेवडगाव येथील अंबिका देवी यात्रा उत्सव समिती, सरपंच, सदस्य व तंटामुक्ती अध्यक्ष यांनी केले असून सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.