सार्वे पिंप्री खुर्द प्र.पा.तर्फे २६ जुलै रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ३०० रुग्णांची तपासणी व अपंग बांधवांना अनुदान वाटप.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०७/२०२१
पाचोरा तालुक्यातील पिंप्री खुर्द प्र.पा. तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व अपंग बांधवांना शासकीय अनुदानाच्या वाटपाचा कार्यक्रम दिनांक २६ जुलै सोमवार रोजी जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत घेण्यात आला. या भव्य आरोग्य शिबिराची सुरुवा श्री. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
त्यानंतर डॉ .भूषणदादा मगर यांनी आपले आरोग्य निरोगी रहाण्यासाठी काय केले पाहिजे, आहार, विहार पध्दती, पावसाळ्यात घ्यावयाची काळजी व इतर माहिती देऊन आरोग्याविषयी सविस्तर माहिती देत कोरोना या आजाराबाबत माहिती देऊन कोरोनाची लागण होणार नाही म्हणून काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल माहिती दिली.
या शिबिरात पाचोरा येथील विध्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर तज्ञ डॉक्टर मा.श्री.भुषणदादा मगर यांनी ३०० रुग्णांची तपासणी करुन योग्य ते उपचार केले. व काहिंना पुढील उपचारासाठी योग्य सल्ला देत योग्य मार्गदर्शन केले तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत विस अपंग बांधवांना अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात आले आहे.
या शिबिरासाठी देवीदास वाघ, देवीदास सांवळे सर, किशोर पटोळ, कचरू पाटिल, तेजराव आमटे, दिनेश काकडे, भिकन तड़वी, नाना सुस्ते, बाबू साहेब पडोळ, भगवान सुस्ते, ग्रामसेवक के.डी.पवार, रमेश शेठ, समाधान कोळी, सचिन शिंगारे, अनिल तडवी, ग्रामपंचायत शिपाई बाबासाहेब पाटील, सदीप शिंपी, अर्जुन गायकवाड व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
शिबिराचे यशस्वीतेसाठी सार्वे पिंप्री खुर्द प्र.पा.ग्रामपंचायतीचे सरपंच मा.श्री. अमोलभाऊ बाविस्कर, उपसरपंच सौ.कल्पनाताई पाटील, ग्रामपंचायत सदस्य सौ.वंदनाताई पाटील, सौ.अकिलाबाई तडवी,सौ.तुळसाबाई पाटील,मा.श्री. किशोर पाटील,मा.श्री. वाल्मिक तडवी, मा.श्री. कैलास पवार, मा.श्री. अनिल तडवी, पोलिस पाटील सौ.सुनिताताई पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच या शिबिरासाठी गावातील तरुण वर्ग व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.