कुऱ्हाड खुर्द येथे ब्रेक द चेन लॉकडाऊचा फज्जा- ग्रामपंचायतीकडून डोळेझाक.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०५/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द गावासह सगळीकडे कोरोनाचा वाढता संसर्ग व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने गावपरिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शासनाने चैन द ब्रेक अभियान आमलात आणून कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात यावी यासाठी काही निर्बंध लावण्यात आले आहे.
परंतु कुऱ्हाड मध्ये मात्र चैन द ब्रेक अभियानाचा फज्जा उडालेला दिसून येत आहे. कुऱ्हाड मधील बस स्थानक परिसरात तसेच गाव दरवाजा व गावठाण परिसरात सायंकाळी पाच वाजे पासून तर रात्री उशिरापर्यंत एकप्रकारे जत्राच भरलेली असते. काही किराणा दुकानदार आपल्या दुकानाचे अर्धवट शटर उघडे ठेवून तर काही दुकानदार रात्रंदिवस दुकाने सताड उघडे ठेवून रात्री १० वाजेपर्यंत आपला व्यवसाय करतात. विशेष म्हणजे दुकानदारी करतांना सोशल डिस्टेंसिंग (सामाजिक) अंतर राखत दुकानाजवळ घोळका जमा करतात. तर नाईक नगर येथील एक फळ विक्रेता रात्री ९ वाजेपर्यंत बसस्थानक परिसरात आपले दुकान लागून बसतो.व याच ठिकाणी मित्रमंडळी सोबत जमा करून गप्पा रंगतात.
तसेच बुधवार दिनांक ०५ मे रोजी या गावात छोटेखानी बाजारही भरला होता या ठिकाणी सुध्दा सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडाला होता.
कुऱ्हाड मध्ये कोरोनाचा संसर्ग इतका वाढला आहे की ४ ते ५ दिवसात कोरोना लागण मुळे २ तरी वेक्ती दगावतात. तरीही कोरोनाची कोणतीही भिती न बाळगता व कोणत्याही न जुमानता लॉकडाऊचा फज्जा उडवतांना दिसून येते. हा प्रकार असाच सुरु राहिल्यास कुऱ्हाड गावातील कोरोनाची आकडेवारी पून्हा वाढण्यासाठी वेळ लागणार नाही. असे मत सुज्ञनागरीकांनी व्यक्त केले आहे.
एका बाजूला आरोग्य विभाग रात्रंदिवस मेहनत घेत असून लसीकरण मोहीम राबवत असतांनाच दुसरीकडे ग्रामस्थ मनमानीपणे वागून लॉकडाऊचा फज्जा उडवतांना दिसत असल्यावरही ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने सुज्ञनागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे.