सार्वे येथील शेतकऱ्याची गाय लम्पी स्कीन आजाराने दगावली, साठ हजार रुपयांचे नुकसान.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/१०/२०२२

पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या सार्वे (जामने) येथील शेतकरी प्रभाकर बळीराम दुधे यांच्या मालकीची अंदाजे साठ हजार रुपये किंमतीची गिर गया लम्पी आजाराची लागण झाल्यामुळे उपचारादरम्यान दगावल्याची घटना दिनांक ०१ ऑक्टोबर २०२२ शनिवार रोजी घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा तालुक्याचे पशुधन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सार्वे गावी भेट देऊन गायीचे शवविच्छेदन करुन गायीला मातीत दफनविधी करण्यात आला आहे.

लम्पी स्कीन आजाराने पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यात पाय पसरले असून सार्वे, जामने, सांगवी, कुऱ्हाड, वडगाव, कोकडी तांडा, कळमसरा व इतर गावांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तसेच तालुका पशुसंवर्धन विभागाकडून जलदगतीने लसीकरण मोहीम राबवून शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ब्रेकिंग बातम्या