शेंदूर्णी येथे शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त केला कोरोना योध्याचा सत्कार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०६/२०२१
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्रभर शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रम राबवून साजरा करण्यात येतो,त्यानिमित्त शेंदुर्णी येथेही शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने कोरोना सारख्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असतांना तो आटोक्यात आणण्यासाठी शेंदुर्णी शहरातील डॉक्टर,वकील, पत्रकार यांनी स्वताच्या जीवाची पर्वा करता शासकीय वैद्यकीय अधिकारी व पोलिस यांच्या सोबत रात्रंदिवस जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी झटत राहिले व खरोखरच बिकट संकटातून वाट काढत शेंदूर्णी शहरातून कोरोनाला हद्दपार केले ही कौतुकास्पद बाब लक्षात घेऊन शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शेंदूर्णी येथील शिवसेनेतर्फे यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यासाठी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख डॉ. मनोहर पाटील. यांची विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सुरवातीला पहूर दरवाजा येथील शिवभोजन केंद्रावर डॉ. मनोहर पाटील यांच्या हस्ते मोफत भोजन वाटप करण्यात आले, तदनंतर पाण्याच्या टाकी शेजारील सोयगाव रोड वरील नियोजित कार्यक्रमास्थळी शेंदुर्णी शहरातील कोरोना योद्धय्यांचा स्वागत/ सत्काराचा कार्यक्रम शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कोरोना योध्दा प्रमाणपत्र, शाल,श्रीफळ देऊन करण्यात आला.
या कार्यक्रमाला डॉ. श्री. सुनील अग्रवाल, उपतालुका प्रमुख डॉ. असोसिएशनचे अध्यक्ष श्री. देवानंद कुलकर्णी, उपाध्यक्ष श्री.भूषणभाऊ गरुड, श्री. अजय सुर्वे व सर्व सदस्य तसेच पत्रकार संघटना, वकील मंडळी पोलिस कर्मचारी, विधानसभा क्षेत्र प्रमुख मा,श्री नीलकंठ भाऊ पाटील,युवासेना उपजिल्हाप्रमुख मा,श्री विश्वजितराजे पाटील,मा,श्री. भरत पवार साहेब,शेतकरी संघटनेचे गोपाल भाऊ, जामनेर शहर प्रमुख अतुल भाऊ सोनवणे, जामनेर उपशहर प्रमुख भैय्याभाऊ,जेष्ठ शिवसैनिक बारकू जाधव,अशोक दादा बारी, सिदु पाटील,रमेश भोसले,अरुण गवळी,बापू बारी,रवी पवार,भूषण बडगुजर, शिवसैनिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.