तीन कृषी कायदे मागे घेतल्याने पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा जल्लोष.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/११/२०२१
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा करताच पाचोरा येथे जल्लोष.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा करताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे माजी आमदार दिलीप वाघ यांचे नेतृत्वाखाली पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी केली. मिठाई वाटून, घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक विकास पाटील, नितीन तावडे, शहराध्यक्ष अजहर खान, सतिष चौधरी, शेतकरी संघाचे चेअरमन सुनिल पाटील, बाजार समितीचे प्रशासक रणजित पाटील, अॅड. अविनाश सुतार, भगवान मिस्तरी, दत्ता बोरसे यांसह पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
Download WordPress Themes Nulled and plugins.