पुढच्यास ठेच मागचा शहाणा, ग्रामपंचायत निवडणूकीत माघारीच्या दिवशी , अनेकांनी खाल्ल्या ठोकरा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०१/२०२१
पाचोरा तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या , उमेदवारी दाखल झाली तसेच दिनांक ०४ जानेवारी मंगळवारी उमेदवारी मागे घेणे , निवडणूक चिन्हांचे व अनुक्रम नंबरचे वाटप होणार होते म्हणून पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजीमहाराज चौक , रेल्वे टेशन , जैन पाठशाळा, भुयारी मार्गापर्यंत वाहनांच्या रांगा व माणसांची अलोट गर्दी दिसून येत होती.
छत्रपती शिवाजीमहाराज चौक हा अत्यंत वर्दळीचा चौक म्हणून वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली होती वाहतूक सुरळित करण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली होती. परंतु आम्ही चार पुस्तके शिकलो सवरलो म्हणून की काय वाहतूक पोलीस जिवाचे रान करत असतांनाच आम्हाला त्याच भान नसल्याने पोलीसांची दमछाक होत होती.
अशातच भरीत भर म्हणून तहसील कार्यालयासमोर अलोट गर्दी होती. मुख्य प्रवेशव्दाराच्या एका बाजूला शासकीय वाहन ऊभे होते तर एका बाजूने कार्यालयात जाणारांची भरगच्च गर्दी होती.
नेमके प्रवेशव्दाराच्या जवळच रस्त्यावर एक जमिनीत गडलेला दगड होता. गर्दी असल्याने व ग्रामपंचायत निवडणूकीचा डोक्यात जोर व अंगात ज्वर असल्याने सगळ्यांनीच गुढग्याला बाशिंग बांधले असल्याचे चित्र दिसून येत होते.
नेमके याच धुंदीत सगळे कार्यालयीन कामकाजानिमित्त तहसील कार्यालयात जातांना व येतांना कदाचित घाईगडबडीत खाली पाहून चालणे विसरल्याने या रस्त्यावर असलेल्या दगडाची (ठेच) ठोकर खाऊनच पुढे जात होते. या गर्दीत काही बांधव व काही भगिनींना ठोकर इतक्या जोरात लागली की काहींची पादत्राणे तुटली, काहींची बोटे फुटली तर काहींनी अक्षरक्षा दंडवत घातले असे घडत असतांनाही ज्यांना ठेच लागली कींवा ठेच लागुन एखादा पडलाच तर मदत करण्याऐवजी हसणारे जास्त होते. तरीही कोणीही याची दखल घेत नव्हते व हा प्रकार दिवसभर सुरु होता.
हे पाहून मला पूढच्यास ठेच मागचा शहाणा ही म्हण आठवली.
जसे कार्यालयात जातांना कींवा येतांना या वाटेवरच्या दगडाची ठेच लागून वेदना सहन कराव्या लागल्या तसाच अनुभव ग्रामपंचायत निवडणूकीत माघारीच्या दिवशी बऱ्याच लोकांना आला.
ज्यांना आपण आपले समजत होतो तेच एकमेकांच्या विरोधात संघर्ष करतांना दिसून येत होते. मग मनधरणी, खुशामत, हाजी हाजी, आश्वासनांची खैरात, पैश्यांचा पाऊस तर काही ठीकाणी नितीमत्ताचा लिलाव होतांना दिसून येत होता.
हे सगळं घडत असतांनाच तो वाटेतील दगड आठवला की कदाचित हा दगड आजच्या राजकारणा विषयी संकेत देत असावा असा भास झाला.
व मला या हे शब्द आठवले
माणसाने कधीही खाली पाहून चालावे.
रस्त्यावर चालतांना चार पावलं पुढे बघा.
पुढच्यास ठेच मागचा शहाणा.
अशी बरेच काही