कमानी तांडा उपसरपंच काळु राठोड यांचे दुखद निधन.
*💐दुखद निधन💐*
पिंपळगांव कमानी(तांडा),ता.जामनेर येथील रहिवासी,ज्येष्ठ नागरिक,समाजसेवक तथा येथील ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित उपसरपंच-कै.काळू नरसींग राठोड यांचे आज सकाळी-११ः०० वाजता अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.ते ८०’वर्षाचे होते.
त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.१०/०३/२०२१,शनिवार रोजी दुपारी-३ः०० वाजता त्यांचे राहते घर ‘पिंपळगांव कमानी(तांडा),ता.जामनेर’ येथून निघणार आहे.
कै.काळूदादा राठोड हे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत निवडून आले होते आणि त्यांची उपसरपंच पदावर देखील निवड झाली होती.
कै.काळूदादा राठोड यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून आम्ही अतिशय मनमिळाऊ तथा एका समाजसेवकाला मुकलो आहोत असे मत जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण यांनी कै.काळुदादा राठोड यांच्या मृतआत्म्यास श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केले आहे.
कै.काळू नरसींग राठोड यांच्या मृतआत्म्यास चिरशांती लाभो हिच जय सेवालाल बहुउद्देशीय संस्था तथा समस्त चव्हाण परीवार-पिंपळगांव कमानी(तांडा),ता.जामनेर,तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली व परमेश्वर चरणी प्रार्थना.
कै.काळुदादा राठोड यांच्या पश्चात पत्नी,१ मुलगा,१मुलगी,सुना आणि नातवंडे असा परीवार आहे.
*💐शोकाकूल💐*
जय सेवालाल बहुउद्देशीय संस्था(रजि.) तथा समस्त राठोड परीवार-पिंपळगांव कमानी(तांडा),ता.जामनेर,जि.जळगाव.