पिंपळगाव हरेश्वर येथे २२ मार्च ते २४ मार्च पर्यंत जनता कर्फू.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०३/२०२१
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर हे जवळपास पंचवीस हजार लोकवस्तीचे गाव असून मोठी बाजारपेठ आहे. तसेच पिंपळगाव हरेश्वर येथे दर मंगळवारी आठवडे बाजार भरत असतो. या बाजारात जळगाव जिल्ह्यासह मराठवाड्यातील व्यवसाईक मोठ्या प्रमाणात आपला व्यवसाय करण्यासाठी येतात. तसेच आसपासच्या विस गावातील शेतकरी, हात मजूर संसारपयोगी वस्तू कपडेलत्ते घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात.
परंतु आता महाराष्ट्रात तसेच जळगाव जिल्ह्यात व जिल्ह्यातील गावागावात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून याचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने कोरोनाचा प्रसार वाढुनये म्हणून तातडीचा उपाय म्हणून सामाजिक अंतर राखत मानवी साखळी खंडित करणे महत्त्वाचे असल्याने पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, तसेच सुज्ञ नागरिक व पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन यांनी जनता कर्फू करण्यासाठी शासन, प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सल्लामसलत करुन जनता कर्फू करण्याचे ठरवण्यात आले आहे.
या जनता कर्फूत दिनांक २२ मार्च सोमवार पासून ते २४ मार्च बुधवार पर्यंत कडकडीत बंद पाळून जनताकर्फू करण्याचे जाहीर करण्यात आले असून दिनांक २३ मार्च मंगळवारी भरणारा आठवडे बाजार बंद करण्यात आला आहे. तरी यादिवशी कोणत्याही व्यवसाईकांनी आपली दुकाने घेऊन बाजारात येऊ नये तसेच ईतर दिवशी फेरीवाल्या व्यवसाईकांनी पिंपळगाव हरेश्वर गावात येऊ नये असे जाहीर करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करनारांवर कडक कारवाई करण्यात येईल असे जाहीर केले आहे.
तसेच या जनता कर्फू मध्ये दुध डेअरी व वैद्यकीय सेवा, औषधालये वगळता सर्व व्यवसायाची दुकाने, आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून जनतेने सहकार्य करावे असे जाहीर करण्यात आले आहे.