‘मृत्यूकार’ विनोद अहिरे आज आकाशवाणीवर
‘मृत्यूकार’ विनोद अहिरे आज आकाशवाणीवर
जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले, पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे यांची ध्वनिमुद्रित केलेली मुलाखत आज दिनांक २८/१०/ २०२० रोजी रात्री नऊ वाजता ‘लोकजागर’ या सदराखाली जळगाव आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणार आहे. विनोद अहिरे यांनी “मृत्यू घराचा पहारा” हे कोरोना आयोग योद्ध्यांच्या वेदनेचं देशातील पहिले पुस्तक लिहून काढले आहे. त्यानिमित्ताने जळगाव आकाशवाणीने त्यांची काही दिवसांपूर्वी मुलाखत घेतली होती,ती आज प्रसारित होणार आहे.
मार्च-एप्रिलमध्ये जी जगभरामध्ये कोरोना महामारी बद्दलची भीती होती, त्याला पोलिसही अपवाद नव्हते.अशा परिस्थितीत विनोद अहिरे यांची जळगाव सिव्हिल हॉस्पिटल मधील ‘कोरोना संसर्गजन्य कक्ष’ येथे गार्ड ड्यूटी लावण्यात आली, त्यावेळेला सदरचे कर्तव्य पार त्यांना त्यांच्या त्या भावना होत्या, त्यांना ज्या वेदना झाल्या, ते सर्व शब्दबद्ध करून त्यांनी ‘मृत्यू घराचा पहारा’ हे पुस्तक लिहून पोलिसांच्या वेदनेला समाजासमोर आणले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपले संपूर्ण एक महिन्याचे वेतन कोविड सहायता निधी (मुख्यमंत्री निधीत) जमा केले होते. असे आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीत जमा करणारे ते महाराष्ट्रातील एकमेव पोलीस कर्मचारी आहेत. त्यानिमित्त त्यांचे महाराष्ट्रभरातून कौतुक झाले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांची आज आकाशवाणी जळगाव केंद्रावर मुलाखत प्रसारित करण्यात येणार असून,जास्तीत जास्त जनतेनी सदरची मुलाखत ऐकावी असे आवाहन जनतेला करण्यात येत आहे.
९८२३१३६३९९