पिंपळगाव हरेश्वर येथे कोरोना लसीकरणास आज पासून झाली सुरुवात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०३/२०२१
पिंपळगाव हरेश्वर ता पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात जि.प.सदस्य मा.श्री. मधुकरभाऊ काटे, पिंपळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच मा.श्री.सुखदेव गिते सर व हरिहरेश्वर मंदिर संस्थानचे अध्यक्ष मा.श्री. शालिग्राम मालकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी उपसभापती सौ.रत्नप्रभा पाटील. यांच्या हस्ते फित कापून कोरोना लसीकरण सुरवात करण्यात आली.
केंद्रप्रमुख डॉ.अमित साळुंखे, डॉ मोहित जोहारे, डॉ नाईक, सरपंच सुखदेव गीते सर, माजी सरपंच डॉ शांतीलाल तेली, माजी सरपंच अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र देव, कैलाश क्षीरसागर, अंतिम महाजन, दिलीप जैन (पिंपळगाव हरेश्वर), अजय तेली, ग्राम विकास मंडळाचे चिटणीस रवींद्र जाधव, गोविंद मंदिर संस्थान चे अध्यक्ष शाम बहाळे तसेच गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी ग्रामीण रुग्णालयाच्या सर्व सिस्टर, ब्रदर यांनी सहकार्य केले. प्रभाकर शंकर क्षीरसागर यांना यावेळी प्रथम लस देऊन शुभारंभ करण्यात आला.
लसीकरण करुन घेण्यासाठी दररोज सकाळी १० ते ५ ही वेळ ठरवण्यात आली असून लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी यावेळात उपस्थित राहून लसीकरण करून घ्यावे तसेच रविवारी लसीकरण बंद राहील अशी सुचना केंद्रप्रमुख मा.श्री. डॉ. अमितजी साळुंखे यांनी केली आहे.
(पिंपळगाव हरेश्वर येथे कोव्हीड लसीकरण त्वरित सुरु करण्यासाठी मा.श्री. शालिग्राम मालकर यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पाठपुरावा केल्याने त्वरित लसीकरणाची सुरुवात झाली असल्याचे समजते.)