जळगांव लोकसभेचे खासदार उन्मेश पाटील यांना भुसावळ-नासिक-मुंबई मेमु रेल तात्काळ सुरू व्हावी MST पास मिळून या पासधारकांना प्रवासास परवानगी मिळावी यासाठी साकडे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०६/२०२१
चाळीसगाव, पाचोरा, नांदगाव येथून हजारो प्रवासी व रोजचे प्रवासी आपल्या व्यवसाय, नौकरी, शिक्षण निमित्त नासिक – भुसावळ दरम्यान असलेल्या स्टेशनवर प्रवास करतात, पण सध्या काही रेल्वे बंद व ज्या सुरू आहेत त्यातही रोजच्या प्रवासी वर्गाला कुठलाही दिलासा न मिळत असल्याने तसेच भुसावळ नासिक मुंबई मेमु ही बंदच असल्याने प्रवासाच्या सर्व समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यांकडे लक्ष वेधण्यासाठी व समस्या सुटण्यासाठी चाळीसगांव, पाचोरा, नांदगाव येथील रेल्वे प्रवासी वर्गाने माननीय खासदार उमेश दादा यांना साखडे घालत निवेदन दिले.
आज विविध संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व प्रवाशांनी माननीय खासदार उमेश दादा पाटील यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली व आपल्या विविध समस्यांबद्दल माननीय खासदार उमेश दादा पाटील यांच्याशी चर्चा केली यात मुख्यत चाळीसगाव ते जळगाव अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांना मासिक पासची सुविधा लवकरात लवकर सुरू करून या पासधारकांना प्रवासास परवानगी मिळावी, तसेच नाशिक भुसावळ शटल, भुसावळ मुंबई पॅसेंजर तसेच मेमु ट्रेन सुरू होण्यासंदर्भात चर्चा केली.
यावेळी मा. खासदारांनी अत्यंत आपुलकीने सर्व प्रवाशांची विचारपूस करून तात्काळ माननीय जनरल मॅनेजर भुसावळ, माननीय रेल्वे बोर्ड दिल्ली चे प्रमुख यांच्याशी फोनवर चर्चा केली व त्यांनी त्यांना सांगितले की चाळीसगाव, पाचोरा तालुका व या शहरातून जवळपास हजारो लोक जळगाव, भुसावळ येथे अप-डाऊन करतात त्यांना स्वतःची गाडी घेऊन जाणे परवडत नाही तसेच पॅसेंजर गाडी बंद असल्यामुळे व पास बंद असल्यामुळे आमच्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहे येत्या दोन महिन्यात ही समस्या सोडवावी तसेच दोन-तीन दिवसात यासंदर्भात रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष बरोबर मी बैठक घेतो असे आश्वासन दिले, दादांनी अतिशय आत्मीयतेने हा प्रश्न तडीस नेण्यास सांगितले आहे. सर्वच प्रवासी व प्रवासी संघटनेचे यांतून प्रवासी वर्गाच्या पदरात काय व कधी पडते याकडे लक्ष लागून आहे,