पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या गुरांचे बाजार कोविड-१९ चे नियम पाळून सुरु करा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०६/२०२१
कोविड~१९ च्या नियमावलीचे पालन करत गुरांचे बाजार सुरु करण्यासाठीची परवानगी द्यावी अशी मागणी पाचोरा भडगाव तालुक्याचे माजी आमदार व कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक मा.श्री. दिलीपभाऊ वाघ यांनी जिल्हाधिकारी मा.श्री. अभिजित राऊत साहेब जळगाव यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
महाराष्ट्र शासनाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे आठवडे बाजार पुढील आदेश होईपावेतो बंद केलेले आहेत. मात्र सद्याचा काळ हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा व शेतीच्या मशागतीचा आहे. या काळात शेतकऱ्यांना पूर्व हंगामी मशागतीसाठी व नंतर देखील बैलाची नितांत आवश्यकता असते. तसेच याच हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात दुग्धव्यवसाय करण्यासाठी गायी, म्हशी, शेळ्या यांची खरेदी विक्री करीत असतात. अनेक गरीब शेतकरी वर्षभर पाळलेल्या शेळ्या, मेंढ्या यांची या काळातच विक्री करून त्याच्या येणाऱ्या पैश्यातून वर्षभरासाठी शेतीसाठी लागणारी खते, बियाणे, औषधी व मजुरी यासाठीची रक्कम जमवत असतो.नेमका याच काळात गुरांचा बाजार बंद असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
तर दुसरीकडे बेकायदेशीर गुरांचे बाजार भरत असल्याचे दिसून येत आहे. या बेकायदेशीर बाजारात बाजार समितीला देखील या बेकायदेशीर व्यवहारातून कोणतीही फी मिळत नसल्यामुळे बाजार समितीचे देखील आर्थिक नुकसान होत आहे. (तसेच गुरांच्या खरेदीसाठी व विक्रीसाठी घेणाऱ्या व देणाऱ्या व्यक्ती तोंडी व्यवहार करत असल्याने बिना पावतीची देवाणघेवाण होत असल्याने यात चोरून आणलेल्या गुरांना विक्री करतांना कोणत्याही अडचणी येत नसल्याने गुरे चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच चांगल्या शेतकऱ्यांना गरज असल्याने चांगल्या प्रतिची जनावरे मातीमोल भावाने घेऊन ती कत्तलखान्यात पाठवण्यात येत आहेत.)
तरी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी पत्रात नमुद केलेल्या बाबींचा विचार करुन पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेले गुरांचे आठवडे बाजार कोविड-१९ चे नियम पाळून सुरु करण्यासाठी आपल्या स्थरावरून आम्हास परवानगी देऊन सहकार्य करावे अशी मागणी केली असून आठवडे बाजाराच्या दिवशी आम्ही कोरोना प्रतिबंधक सर्व उपाययोजना राबवून शेतकरी व व्यापारी यांची त्यादृष्टीने पूर्णपणे काळजी घेण्याची हमी दिली आहे.
सदरचे गुरांचे आठवडे बाजार कोविड-१९ चे नियम पाळून सुरु करण्यास आपल्या स्थरावरून लवकरात लवकर परवानगी द्यावी अशी विनंती पत्राव्दारे केली असून.निवेदनाच्या प्रती ना.बाळासाहेब पाटील, मंत्री सो.सहकार व पणन वस्रोद्योग ,ना.दादासाहेब भुसे, मंत्री सो. कृषी, आमदार किशोर पाटील, विधानसभा सदस्य पाचोरा-भडगाव व जिल्हा उपनिबंधक जळगाव.यांना दिले आहे.
(महत्त्वाचे)
आज सकाळी बाजार समितीचे प्रशासक अॅड.मा.श्री. अभय पाटील यांनी वरखेड येथील गुरांच्या बाजाराचे ठिकाणी भेट दिली तेथे सार्वजनिक व राष्ट्रीय महामार्गावर काही व्यापारी व शेतकरी बकऱ्या व गुरांचे व्यापार करतांना दिसले अशाप्रकारे मोकळ्या वातावरणात बाजार करणे धोकादायक असल्याची बाब त्यांनी संबंधितांच्या निदर्शनास आणून दिली त्यानुसार सदर ठिकाणी शेतकरी व व्यापाऱ्यांनी अॅड. अभय पाटील यांना मार्केट यार्ड उघडून द्यावे अशी विनंती करत आम्ही कोविड~१९ चे नियम पाळून गर्दी न करता बाजार व्यवहार सुरळीतपणे करू असे आश्वासन देत आम्हालाही आमच्या जीवाची काळजी आहे असे सांगितले ही बाब अॅड. अभय पाटील यांनी मुख्य प्रशासक दिलीप भाऊ वाघ यांच्या निदर्शनास आणून दिली.याची दखल घेत मा.श्री. दिलीप वाघ यांनी लगेचच पत्राव्दारे जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.