पाचोरा भुयारी मार्गातील जीवघेणे खड्डे, नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष.

अनिल आबा येवले.(पाचोरा)
दिनांक~०६/११/२०२२
पाचोरा शहरातील मानसिंका गेट समोरील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये काल रात्री एका दुकानाला अचानकपणे आग लागली ही आग विझवण्यासाठी आसपासच्या काही नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न करत नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला फोन करुन अग्निशमन बंब मागवला होता परंतु हा अग्निशमन बंब नादुरुस्त असल्याकारणाने तो फक्त आणि फक्त शो पीस ठरल्यामुळे घटनास्थळी उपस्थित संतप्त नागरिकांनी पाचोरा नगरपालिकेच्या गलथान कारभाराचा चांगलाच समाचार घेत जागेवरच शिव्यांची लाखोली वाहिली यावरुनच पाचोरा नगरपरिषदेच्या गलथान कारभाराचा भांडाफोड झाला असून पाचोरा शहरात अशा बऱ्याचशा समस्या भेडसावत असल्याने नगरपालिकेवर प्रशासकीय सत्ता असल्याकारणाने अधिकारी व कर्मचारी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पाचोरा शहरातील मानसिंगका गेट समोरील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये काल रात्री आग विझवण्यासाठी नागरिकांचा आटापिटा.
अशीच एक समस्या पाचोरा शहरातील भुयारी मार्गात पडलेल्या खड्ड्यांमुळे उद्भवली आहे. कारण पाचोरा शहरातील नामांकित डॉक्टरांकडे जाणारे रुग्ण, नामांकित शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने जाणारा विद्यार्थी वर्ग, दाणा बाजारात जाणारे व्यापारी व शेतकरी वर्ग तसेच भडगाव तालुक्यातील लोकांना पाचोरा शहरात येण्या, जाण्यासाठी एकमेव रस्ता आहे. तसेच मा. प्रांताधिकारी साहेब, मा. तहसीलदार साहेब, मा. आमदार साहेब, आजी, माजी लोकप्रतिनिधी विशेष म्हटले तर पाचोरा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी मॅडम याच भुयारी मार्गातून नियमितपणे येत व जात असतांनाही या भुयारी मार्गात पडलेल्या खड्यांकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते आहे.
आधीच नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे भुयारी भुयारी मार्गात थोडासाही पाउस झाला तरी पावसाचे पाणी साचते तसेच मागील बऱ्याच दिवसांपासून ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे व रहदारी जास्त प्रमाणात असल्याने वाहनांची संख्या लक्षणीय असल्याने वाहन धारकांना खड्डे चुकवतांना खुपच कसरत करावी लागते. विशेष म्हणजे नवीन वाहनधारकांना खड्डे लक्षात येत नसल्याने बरेचसे वाहनधारक या खड्यात पडतात व मागाहून येणारी वाहने एकमेकांना धडकून वादविवाद होतात असा खेळ सुरु असतांनाच मात्र पाचोरा नगरपालिकेने या खड्यांच्या गंभीर प्रश्नाकडे कमालीचे दुर्लक्ष केले असल्यामुळे सर्वसामान्य जनता, विद्यार्थी वर्ग व सुज्ञ नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.