भाजपा जळगावच्या भव्य किसान मोर्यात हजारोंच्या संख्येने सामील व्हा (जि.फ.सदस्य मधुकर काटे ) यांचे अवाह

दिलीप जैन (पाचोरा)
निसर्गाच्या लहरीपणामुळे आज शेतकरी अनेक अडचणीत सापडला असून शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने तो हतबल झाला आहे.
त्यातच राज्यसरकारने काही निर्णय चुकीचे घेतल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अजूनच भर पडली आहे
म्हणून केळी पिक विमा निकष पूर्वीप्रमाणे घेण्यात यावेत , अवकाळी पावसामुळे शेतीमालाची झालेली नुकसान भरपाई त्वरीत मिळावी या करीता भाजपा जळगाव तर्फे दिनांक ९ नोव्हेंबर सोमवार रोजी सकाळी ठीक ११ वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे तरी जिल्हाभरातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मोर्चात सामील व्हावे अशी विनंती जिल्हा परिषद सदस्य मधूकर काटे यांनी कले आहे
( भाजपाच्या बँनरवर अनावधानाने व नजरचुकीने रक्षाताई खडसे यांचा फोटो घ्यायचा राहून गेला होता आता ती चुक लक्षात आल्याने पहिले बँनर काढून टाकण्यात आले असून नवीन बँनरवर माननीय रक्षाताई यांचा फोटो घेऊन चुक सुधारली आहे या बाबतीत कुणीही गैरसमज करू नये किंवा पसरवू नये ही विनंती
रस्त्यावर गतिरोधक व राजकारणात विरोधक असल्याने नक्कीच फायदा होतो व अनावधानाने फोटो राहिला होता परंतु फोटो नसल्याचे विरोधकांनी लक्षात आणून दिले म्हणून चुक सुधारता आली आम्ही त्यांचे आभारी आहोत असा खुलासा जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांनी केला व मोर्च्यात सामील व्हा अस