आघाडी सरकारच्या पुकारलेल्या बंदला, पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचा चोख बंदोबस्त.

वरखेडी येथे बंदोबस्त कामी उपनिरीक्षक दिगंबर थोरात, पो.कॉ.मनोज महाजन, दिपक शिंदे,प्रदिप पाटील व पोलीस पाटील बाळू कुमावत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/१०/२०२१
उत्तर प्रदेशातील लखिंपुर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारण्याच्या घटनेविरोधात आज महाविकासआघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या महाराष्ट्र बंदच्या दिवशी कुठेही गालबोट लागू नये म्हणून अतिदक्षता घेत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिगंबर थोरात व त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावागावात चोख बंदोबस्त ठेवला होता.
यात पिंपळगाव हरेश्वर, वरखेडी,शिंदाड,कुऱ्हाड खुर्द, लोहारा,कळमसरा, डोंगरी सातगाव, अंबे वडगाव या मोठ्या लोकसंखेच्या गावात व इतर लहान मोठ्या गावात पो.हे.कॉ.रणजित पाटील, अरुण राजपूत, संदिप राजपूत, राकेश खोंडे,मनोज महाजन, दिपक शिंदे, प्रदिप पाटील व सर्व
पो.हे.कॉ,पो.कॉ,पो.नाईक,पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. या परिसरात आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत होते. बऱ्याचशा व्यवसायीकांनी आपली दुकाने नियमितपणे उघडून आपले व्यवसाय सुरु ठेवल्याचे दिसून येत होते.