चर्मकार बांधवांचे आर्थिक बजेट कोलमडले.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०५/२०२१
सततच्या लॉकडाऊनचा फटका भल्याभल्यांना बसला असून सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना आपल्या उदरनिर्वाहासाठी मार्ग सापडत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. शासनमान्य स्वस्तधान्या दुकानातून मोफत़ धान्य वाटप करत असले तरी भाकरी गोड करुन घेण्यासाठी लागणारा भाजीपाला, मिठ, मिरची, तेल, मसाला ह्या स्वयंपाटघरातील महत्वाच्या वस्तू आहेत. याकरिता दोन पैसे हातात असले म्हणजे भाकरी गोड होते. तसेच कपडे लत्ते, दवाखाना व इतर गरजा भागवण्यासाठी दोन पैसे हातात लागतातच
परंतु सततच्या लॉकडाऊनमध्ये हाताला काम नसल्याने भूमीहीन शेतमजूर व लहानमोठे व्यवसायीक काम करण्याची इच्छा असूनही हाताला काम नसल्याने खुपच अडचणीत सापडले आहेत. यात चर्मकार बांधवांचे ही हाल होत आहेत.
यात महत्त्वाचा विषय म्हणजे शासकीय कर्मचारी वगळता शाळेतील शिक्षक, विविध कंपनीत काम करणारे कर्मचारी तसेच बऱ्यापैकी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना काळा बुट कंपल्सरी असल्याने दररोज बुट पॉलिश करणारांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. परंतु सततच्या लॉकडाऊन काळात कंपन्या व शाळा, कॉलेज बंद असल्याने बुट पॉलिश करण्यासाठी व बुट, चप्पलच्या व दप्तराचे दुरुस्तीसाठी कोणीही येत नाहीत.
तसेच प्रगत युगात लेदर पीव्हीसी, प्लास्टिक, कापडी बुट बाजारात आले असून चपलाचीही तीच परिस्थिती असल्याने बुट पॉलिश करण्याचा व्यवसाय नावापुरताच राहिला आहे. तसेच वरील प्रकारचे बुट, चप्पल रबरी असल्याने दुरुस्तीसाचे कामही थांबले आहे.
शेती उपयोगी विहिरीतून पाणी काढण्यासाठी वापरली जाणारी चामड्याची मोट, गोफण, गुराढोरांच्या मोरख्या याचाही वापर बंद झाला असल्याने चर्मकार बांधव आर्थिक अडचणीत सापडला आहे. हालाखीची परिस्थिती म्हणून घर संसाराचा गाडा ओढण्यासाठी वडीलोपार्जीत व्यवसायात अडकल्याने शिक्षणापासून वंचित असलेला चर्मकार बांधव आज शासकीय मदतीच्या प्रतिक्षेत जीवन जगत आहे.
(कारण मागील वर्षांपासून सुरु असलेल्या सततच्या लॉकडाऊनचा फटका) आता असाहाय्य झाल्याचे मत पाचोरा येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पाचोरा तालुकाध्यक्ष मा.श्री.गोवर्धन जाधव, उपाध्यक्ष मा.श्री.सुपडू सावंत व सचिव मा.श्री. विठ्ठल नंन्नवरे यांनी व्यक्त केले आहे.