दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पाचोरा येथे स्पर्श डिजिटल स्टुडिओ चे भव्य उदघाटन

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=१४/११/२०२०
शिंदाड या खेडेगावातील एका शेतकरी कुटुंबातील तरुण शिक्षण घेतांनाच वडीलांचे संघर्षमय जिवन पाहून आपण काहीतरी वेगळे करुन वडीलांना सुख कसे देता येईल हा निश्चय उराशी बाळगून कठीण परिस्थितीतीवर मात करत आज रोजी पाचोरा येथे दिपावलीचे पर्व साधून भडगाव रोड नवकार प्लाझा येथे स्पर्श डिजिटल ह्या नावाने संदीप बोरसे व किशोर भोसले यांनी स्टुडिओचा शुभारंभ केला या अगोदर मागील चार वर्षापासून संदीप बोरसे यांचा मागील ४ वर्षापासून शिंदाड येथे स्पर्श डिजिटल याच नावाने स्टुडिओ चालू होता या अनुभवाच्या जोरावर त्यांनी आता पाचोरा शहरात पदार्पण करून
स्टुडिओ उदघाटन मा.श्री. अमोल भाऊ शिंदे याच्याहस्ते फित कापून तर जि.प सदस्य मधुभाऊ काटे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कऱण्यात आले. त्या वेळी शिंदाड येथील श्री शांताराम बोरसे पाचोरा येथील नंदूबापु सोमवंशी, फोटोग्राफर असोसिएशन, भगवती फोटो चे मालक गोपाल वासवानी, फोटोग्राफर अमोल पाटील, तुषार पाटील, पंकज पाटील, संदीप पाटील, अविनाश पाटील, हर्षल पाटील, भूषण अहिरे, जळगाव येथी गजेंद्र सपकाळे, रवी सपकाळे, प्रिन्स व्हिडीओ पाचोरा व विनोंद व्हिडीओ पाचोरा तसेच कायदेतज्ज्ञ दीपक पाटील, होम डेकोरेटर हर्षल पाटील, आदी सर्व मान्यवर उपस्थित होते त्या वेळी संदीप बोरसे व किशोर भोसले यांनी उपस्थीतांचे आभार मानले