विध्नहर्ता हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णावर’डॉ अंकुर झंवर’ यांच्या अथक परिश्रमातून यशस्वी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०५/२०२१
पाचोरा येथील विध्नहर्ता मल्टी स्पेशलिट हॉस्पिटलमध्ये जामनेर येथील दादाजी दौलत निकम वय वर्षे (६५) हे कोरोना बाधित झाल्यामुळे उपचारासाठी दखल झाले होते.कोरोना बाधित असल्यामुळे त्यांच्यावर डॉक्टर मा.श्री. भुषण मगर व डॉक्टर मा.श्री. सागर गरुड यांनी योग्य उपचार देऊन कोरोनामुक्त केले होते. परंतु कोरोनामुक्त होऊन उपचार सुरु असतांनाच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांची मृत्यूशी झुंज सुरू झाली होती.
परिस्थिती नाजूक असून लवकरात लवकर कोरोनाच्या उपचारासोबत ह्रदयविकाराचा झटका आल्याने परिस्थिती अजूनच बिकट होत असल्याची बाब विध्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील ह्रदयरोगतज्ञ डॉक्टर मा.श्री. अंकुर झवर यांच्या लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता विध्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर मा.श्री.भुषण मगर व डॉक्टर मा.श्री.सागर गरुड यांच्याशी सल्लामसलत करत अँन्जिओग्राफी करणे अंत्यत गरजेचे आहे असे सांगितले. परंतु कोरोनाच्या उपचारादरम्यान रुग्णाचे रक्त घट्ट झाले असल्याने ह्रदयावर उपचार करणे ही अवघड बाब असल्याने डॉक्टर अंकुर झवर यांनी अगोदर रक्त पातळ होण्यासाठीचे इंजेक्शन दिले मात्र सदर रुग्णाच्या ह्रदयाकडील रक्तवाहिन्या नव्वद टक्के ब्लॉकेज (बंद) झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे दादाजी निकम यांच्या जिवावर बेतू शकते म्हणून अँन्जिओग्राफी करणे हा एकमेव पर्याय असल्याने डॉ. झवर यांनी क्षणाचाही विलंब न करता उजव्या हातातून ऍन्जिओग्राफी केली.
डॉ.अंकुर झवर यांचे अचूक निदान योग्य निर्णय व समयसूचकता राखत योग्यवेळी दादाजी निकम यांच्यावर अँजिओप्लास्टी करुन शेवटच्या क्षणी ह्रदयविकाराच्या झटक्यातून सावरत पुनर्जीवन दिले. म्हणातात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणून शेवटच्या क्षणी डॉ. अंकुर झवर यांनी देव रुपात येऊन (देव तारी,त्यास कोण मारी) या म्हणी नुसार दादाजी निकम यांना एकप्रकारे जीवदानच दिले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.