अज्ञाताची खेळी व विद्यूत वितरण कर्मच्याऱ्याचा बळी. प्रत्येकाचे घर प्रकाशात ठेवण्यासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्याच्या घरात मात्र कायमचा अंधार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०६/२०२१
पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी विद्यूत वितरण कंपनीच्या विरोधात ताला ठोक आंदोलन करण्याचे जाहीर होते. त्यांच्या आदेशानुसार पाचोरा व भडगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी आपपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विद्यूय वितरण कंपनीच्या कार्यालयावर जाऊन शांततामय वातावरणात ताला ठोक आंदोलन केले.
परंतु या आंदोलनाला भडगाव येथे गालबोट लागले असून यात एका विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याचा बळी गेल्याचे खात्रीलायक समजते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा भडगाव तालुक्यात विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला विद्युत ग्राहक वैतागले होते याची दखल घेत पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाला कुलूप लावून ताला ठोक आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. त्या आदेशानुसार आज दुपारी दहा ते बारावाजेच्या दरम्यान सगळीकडे हे आंदोलन शिवसैनिकांनी शांततामय वातावरणात पार पाडले.
असेच आंदोलन भडगाव येथेही करण्यात आले. यात शिवसैनिकांनी विद्यूत वितरण कंपनीच्या कार्यालयाला ताला ठोक आंदोलन करत शांततामय वातावरणात आपल्या भावना शासन दरबारी पोहोचण्याचा प्रयत्न केला.
परंतु भडगाव येथील कार्यालयाला शिवसेनेच्या माध्यमातून कुलुप लावून तेथील शिवसैनिक आंदोलन कर्ते शांततेत निघून गेल्यानंतर अंदाजे एक तासानंतर काही बुरखाधारी बिना नंबरच्या स्वयंचलित दोन दुचाकी घेऊन या कार्यालयावर हजर झाले. व यांनी येथील उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची अरेरावी करत मारहाण झाल्याची घटना घडली व घटने दरम्यान कोठली येथील रहिवासी असलेला विद्युत वितरणचा कर्मचारी गजानन प्रतापराव राणे याच मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.
परंतु भडगाव परिसरात व तालुक्यात या घटनेबद्दल चर्चेला उधाण आले असून या कर्मचाऱ्याचा मृत्यू कश्यामुळे झाला याबाबत उलटसुलट चर्चा सुरु असून काहींच्या मते या कर्मचाऱ्याचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे बोलले जात असले तरी दुसरीकडे या कर्मचाऱ्याचा मृत्यू ह्रदयविकाराचे झटक्याने झाल्याचे बोलले जात आहे.
ही घटना घडताच जळगाव जिल्हाचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री. प्रवीणजी मुंडे साहेब त्यांच्या सहकार्यांसह भडगाव शहरात दाखल झाले. भडगाव पोलिस स्टेशनमध्ये रितसर गुन्हा दाखल झाला असून फिर्यादी अजय अशोक धामोरे वय ४३ धंदा नोकरी उपकार्यकारी अभियंता भडगाव कक्ष राहणार वृंदावन पार्क पाचोरा यांनी भडगाव पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुरन १३३/२०१९ भादवि कलम ३०७,३०४,३५३,३३२,१४३,१४७,१४८,१४९,२९४,२२३,५०४,५०६,४२७ सह सार्वजनिक मालमत्तेची हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. नि. अशोक रावजी उतेकर हे करीत आहे.
[समस्या आली म्हणजे ती सोडवण्यासाठी निवेदन, उपोषण, आंदोलन हे आलेच परंतु या आंदोलनाला गालबोट लागून घराघरातील प्रकाश (उजेड) अबाधित ठेवण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या घरात मात्र कायमचा अंधार झाला आहे ही बाब विसरण्यासारखे नाही.]
सविस्तर बातमी उद्या.