कोरोना सुसाट जळगाव जिल्ह्यात ११९७ रुग्ण आढळले : पुन्हा १७ रुग्णांचा मृत्यू.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०४/२०२१
जिल्ह्यातील बाधीतांचा आकडा ९९ हजार ४५६ वर : आतापर्यंत ८५ हजार ९८९ रुग्णांची कोरोनावर मात तर २४ तासात १७ रुग्णांचा मृत्यू.
जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे तब्बल ११९७ रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ९९ हजार ५८९ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील ८५ हजार ९८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत एक हजार ७५८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, शुक्रवारी एकाच दिवशी ११७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या २४ तासात तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू ओढवला.
शुक्रवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे, जळगाव शहर २६०, जळगाव ग्रामीण ४४, भुसावळ १८०, अमळनेर ७५, चोपडा १६३, पाचोरा ४४, भडगाव ३४, धरणगाव ६०, यावल ४७, एरंडोल ४१, जामनेर ७४, रावेर ३९, पारोळा ०५, चाळीसगाव ५१, मुक्ताईनगर ४४, बोदवड ०३, अन्य जिल्हा ०३ अशी माहिती मिळाली आहे.