सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

राजकीय
Home›राजकीय›जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान.

By Satyajeet News
September 13, 2021
123
0
Share:
Post Views: 51
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०९/२०२१

मुंबई (रानिआ) धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने ५ ऑक्टोबर २०२१ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी ६ ऑक्टोबर २०२१ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

श्री. मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या ५ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १९ जुलै २०२१ रोजी मतदान होणार होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाचे ६ जुलै २०२१ रोजीचे आदेश आणि राज्य शासनाने कोविड-१९ मुळे पोटनिवडणुका स्थगित करण्याबाबत केलेली विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका ९ जुलै २०२१ रोजी आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या होत्या. या प्रकरणी ९ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या सुनावणीत मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचे ११ ऑगस्ट २०२१ रोजीचे कोविड-१९ संदर्भातील निर्बंध पोटनिवडणुकांसाठी लागू होत नसल्याचा निर्णय दिला आहे.

तसेच पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पुढे चालू ठेवण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ निर्णय घेण्याबाबतही आदेश दिले आहेत. हे आदेश आणि कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेवून राज्य निवडणूक आयोगाने आता पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरसह पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोना रुग्णांची संख्या व आठवडाभरातील दैनंदिन व मृतांच्या संख्येबाबत अहवाल मागविला होता. त्यावरून या सहा जिल्ह्यांतील कोरोना परिस्थिती आटोक्यात असल्याचे दिसून आले.

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरच्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी २२ जून २०२१ रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमात पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. कारण त्यावेळी कोविड-१९ संदर्भातील राज्य शासनाच्या निकषानुसार पालघर जिल्ह्याचा समावेश स्तर-३ मध्ये होता. त्यामुळे तेथील पोटनिवडणुका जाहीर केलेल्या नव्हत्या. आता मात्र या सर्व निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी १५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२१ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. २१ सप्टेंबर २०२१ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. पुढील टप्पे धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरच्या जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसोबत होतील. कारण या पाच जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम छाननीनंतर स्थगित करण्यात आला होता. आता पालघरसह सर्व ठिकाणी २१ सप्टेंबर २०२१ रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

नामनिर्देशनपत्रासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी २७ सप्टेंबर २०२१ रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी २९ सप्टेंबर २०२१ पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. ५ ऑक्टोबर २०२१ रोजी मतदान; तर ६ ऑक्टोबर २०२१ रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या एकूण १४४ निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होईल. त्यासाठी कोरोना संदर्भातील आवश्यक ते सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजून दक्षता घेण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले असल्याचे श्री. मदान यांनी सांगितले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

दिगंबर जैन बांधवांचा पर्युषण पर्व १० सप्टेंबरला ...

Next Article

पिंपळगाव हरेश्वर पो. स्टेशनची मोठी कारवाई हात ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    कृषि पदवीधर युवाशक्ती संघटना पाचोऱ्याच्या वतीने आ.रोहित पवार यांना निवेदन.

    January 24, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    वरखेडी ग्रामपंचायतीवर, प्रभारी सरपंच पदी डॉ. धनराज पाटील.

    October 2, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    आप्पांना सांग हजारो बहिणी तुमच्या पाठीशी उभ्या आहेत, सौ. प्रियंका पाटील यांना मतदार भगिनींनी दिला शब्द.

    November 2, 2024
    By Satyajeet News
  • राजकीय

    आजची बैठक भविष्यातील महाविकास आघाडीची नांदी असून हा आघाडी धर्म ग्रामीण भागातील सत्तेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आ. किशोरआप्पा ...

    October 2, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    ग्रामविकास मंडळाच्या निवडणुकीत मतदान केंद्रावर सावळा गोंधळ, मते मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल.

    October 16, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघातील प्रताप पाटील यांची भूमिका तळ्यात, मळ्यात विजयाची माळ कशी काय पडेल गळ्यात.

    October 26, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    श्री.स.भु प्रशाला गोंदेगाव येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

  • Uncategorized

    अंबे वडगाव येथील पी.सी.के.कॉटन जिनिंगच्या ढेप गोडाऊनला आग लागून अंदाजे साठ लाख रुपयांचे नुकसान.

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा येथील प्रांताधिकारी निवासस्थानाचे आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांचे हस्ते भूमिपूजन संपन्न.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज